Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

दरेगाव येथील दुचाकीस्वाराचा केळवद येथे अपघात

Bike

सिंदखेडराजा – भरधाव कारने दुचाकीला उडवले . यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला . ही घटना आज , 26 जूनला सायंकाळी 5 च्या सुमारास बुलडाणा- चिखली रोडवरील केळवदजवळील हनुमान मंदिराजवळ घडली . घनश्याम सुरेश बंगाळे ( 40 , रा . दरेगाव , ता . सिंदखेडराजा ) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . घनश्याम बंगाळे हे त्यांच्या दवाखान्याच्या कामासाठी बुलडाणा येथे आले होते . काम आटोपून परत जात असताना केळवदजवळील हनुमान मंदिराजवळ चिखलीकडून येणाऱ्या कारने ( क्रमांक एमएच 22 , यू 8047 ) त्यांना जबर धडक दिली . यात गंभीर जखमी झालेल्या घनश्याम बंगाळे यांना नागरिकांनी तातडीने बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलवले . बुलडाण्यात प्राथमिक उपचार करून त्यांना औरंगाबाद येथे हलविल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले .

Leave A Reply

Your email address will not be published.