Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कार चोरीचा प्रयत्न;3 आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

लोणार,विष्णु आखरे पाटील – लोणार तालुक्यातील मांडवा येथे 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कार चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून तीन आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शाम दराडे यांनी 29 ऑगस्ट रोजी दिली आहे.


माडवा येथील रहिवासी श्याम दराडे यांनी बिबी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या घरा शेजारी उभी असलेली कार फॉर टायटॅनियम क्रमांक एम एच 20 सीटी 4348 किंमत अंदाजे 5 लाख 25 हजार रुपये रंग पांढरा ही गाडी रात्रीच्या वेळी उभी असताना चोरट्यांनी गाडीचे दोन्ही साईडचे साईड ग्लास तोडून गाडी गेट तोडून गाडी चोरी करण्याचा प्रयत्न केला सदर गाडीचा आवाज आल्याने श्याम दराडे यांनी बाहेर येउन पाहीले असता दोन चोरटे गाडीजवळ दिसून आले गाडी जवळ जाऊन पाहिले असत चोरटे फरार झाले व पुढे गेले असता सदर चोरटे अज्ञात मोटरसायकलवर बसवून पसार झाले .

शाम दराडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मांडवा येथील विजय दत्तात्रय सोनुणे,राहुल विष्णू मुंडे व अज्ञात मोटरसायकलस्वार यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 अन्वे भादवी 34, 379 ,427, 511 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.