Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

माझी शेती माझा 7/12 मीच नोंदवणार माझा पीक पेरा या मोहिमे अंतर्गत दे.माळी येथे कृषी विभागाकडून मार्गदर्शन कार्यक्रम.

रवींद्र सुरुशे. – महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या ई- पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 13 ऑगस्ट पासून करण्यात आली त्याअनुषंगाने “ माझी शेती माझा सात बारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा ” या मोहिमे अंतर्गत जिल्हाधिकारी बुलडाणा व उपविभागीय अधिकारी मेहकर यांचे मार्गदर्शनात मेहकर तालुक्यातील ई-पीक पाहणीची सुरुवात झाली आहे.


त्या अनुषंगाने आज 26ऑगस्ट रोजी देऊळगाव माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागाकडून आपण डिजिटल माध्यमातून आपला सातबारा वर आपला पिक पेरा कसा नोंदवावा याची इत्थंभूत माहिती कृषी विभाग मेहकरचे अधिकारी राम नवघरे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना डिजिटल माध्यमातून व्यवस्थित समजावून सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्याच मोबाईलवरुन पीक पेऱ्याची माहिती, जलसिंचनाच्या साधनाची माहिती ऑनलाईन ॲपवर कशी भरायची व पिकाचे फोटो कशे अपलोड करावयाचे याबाबतचे करण्यात आले.मेहकर तालुक्यातील सर्वच गावामध्ये ई- पीक पाहणीची सुरुवात झाली असुन आज देऊळगाव माळी येथे मार्गदर्शन करण्यात आले.


ई- पीक पाहणी प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असुन यामध्ये शेतकरी त्यांच्या मोबाईल ॲपमधुन आपल्या पीक पेऱ्याची माहिती जलसिंचनाची साधने, पीकाची परिस्थीती,बांधावरील झाडे इत्यादी नोंदी स्वत: घेउन त्यांचे छायाचित्र अपलोड करु शकतात व संबधित तलाठी यांचे लॉगीन वरुन त्याला मान्यता मिळाल्या नंतर सदर माहिती वेबसाईटवर अदयावत करण्यात येते.

सदर ॲप हा हाताळण्यासाठी अत्यंत सोपा असुन ॲड्राईड फोनवरुन मराठी भाषेमधुन माहिती भरता येते व एका मोबाईल क्रमांकावरुन 10 शेतकऱ्यांची माहिती अदयावत करता येते. सदर ॲप हा गुगल प्ले स्टोअर वर “ ई- पीक पाहणी “ या नावाने सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध असुन देऊळगाव माळी साजातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची माहिती अदयावत करावी असे आवाहन तलाठी विनोद पऱ्हाड यांनी केले. सरपंच किशोर गाभणे, उपसरपंच रंगनाथ चाळगे, माजी सरपंच अशोक गाभणे, डॉ.गीऱ्हे, बी.के.सुरूशे, बबन कापरे,केशव मगर, पत्रकार शिवशंकर मगर व गावातील शेतकरी बांधव ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.