Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

चिखली येथील हत्येचा लागला छडा…!

चिखली येथील हत्येचा लागला छडा ..!
चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी
सिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आरोपींना शोधण्याची ठाणेदार लांडे यांची तारेवरची कसरत फलदायी ठरली आहे. त्यामुळे जनतेच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
तालुक्यातील साखरखेर्डा येथे ठाणेदार म्हणून कायद्याचा आदर निर्माण करीत कर्तव्यरुपी दबदबा निर्माण करणारे अशोक लांडे हे कोणत्याही गुन्ह्याचा तपास लावण्यात यशस्वी ठरले होते. जिल्ह्याबाहेर झालेल्या त्यांच्या बदलीनंतर अनेक सुजाण जण व्यथित झाले होते. मात्र चिखली येथे त्यांची बदली झाल्यावर कायद्याचा प्रभाव व दबदबा कायम ठेवण्यासाठी अशोक लांडे यांचे प्रयत्न सुरू झाले होते. दि. १६ नोव्हेंबर, मंगळवारी रात्री अचानकपणे चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या झाली. या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर गावात निर्माण झालेल्या वेगळ्या वातावरणाला सांभाळत गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी ठाणेदार लांडे यांचेवर आली. त्यात तारेवरची कसरत करीत तपास सुरु होता.
यासंदर्भात हाती आलेल्या वृत्तानुसार घटनेतील तीनही आरोपींचा छडा लागला असून, तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ह्यातील एक आरोपी देऊळगावराजा व दोन आरोपी अंढेरा पोलीस ठाणे क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. चिखली ठाणेदार अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी झाल्यावर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असेही कळते.

Chikhali
Leave A Reply

Your email address will not be published.