Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू धंद्याविरूद्ध नोंदविले 82 गुन्हे

* 73 आरोपींना केली अटक

बुलडाणा,दि. 24:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाई केली आहे.  विभागाचे नागपूरचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात 1 ते 23 नोव्हेंबर दरम्यान धडक मोहिमेत 82 गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच 73 वारस गुन्हे, 9 बेवारस गुन्हे नोंदवून 73 आरोपींना अटक केली आहे. त्याचप्रमाणे 680 लीटर हातभट्टी, 10771 लिटर सडवा, 251 लीटर देशी दारू, 54 लिटर विदेशी दारू व 5 वाहनासह एकूण 17 लाख 89 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

daru

    धडक मोहिमेदरम्यान 23 नोव्हेंबर रोजी रांजणी शिवार ता. लोणार येथे  सापळा लावून एक चार चाकी टाटा कंपनीच्या इंडिका कार क्रमांक एमएच 28 सी 4789 वर कारवाई करण्यात आली. यावेळी कारमध्ये 86 लिटर देशी दारूच्या बाटल्या मिळाल्या.  ही कारवाई चिखलीचे निरीक्षक जी. आर गावंडे यांचे पथकाने केली. सदर कारवाईत सहायक दुय्यम निरीक्षक जी. व्ही पहाडे, जवान एस डी जाधव सहभागी होते. तसेच भरारी पथक बुलडाणाचे निरीक्षक आर. आर उरकुडे यांचे पथकाने एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल हातभट्टी वाहतूक करताना जप्त करण्यात आली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक पी. व्ही मुंगडे, जवान पी.ई चव्हाण, एन ए देशमुख, आर एस कुसळकर, अमोल तिवाने सहभागी होते.

     आपल्या परीसरात अशी अवैध मद्य विक्रीची अथवा बनावट मद्य निर्मीती आढळल्यास  विभागाचे टोल फ्री नंबर 1800833333 वर किंवा व्हॉट्अॅप नंबर8422001133 वर किंवा excisesuvidha. mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळविण्यात यावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालविताना वाहनांचा परवाना आवश्यक आहे. त्याप्रमाणे मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांनासुद्धा सदर विभागाचा मद्यसेवन परवाना असणे बंधनकारक आहे. अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करताना अथवा मद्यविक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 1949 चे कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.