पारिजात इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व पंचायत समिती कृषी विभाग जळगाव जामोद यांच्या मार्फत कपाशी पीक पाहणी कार्यक्रम संपन्न…
गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा.ली. व पंचायत समिती कृषी विभाग जळगांव जा यांच्या मार्फत शेतकरी ऋषिकेश मधुकर येऊल यांच्या शेतात कपाशी चा पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आला…
कपाशी पीक पाहणी कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माननीय कृषी अधिकारी श्री रवी नावकार साहेब तसेच पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रा ली चे डॉ निकिता अवस्थी (पोर्टफोलिओ मॅनेजर,महाराष्ट्र) रिझवान पटेल (मार्केटिंग मॅनेजर,विदर्भ) आशिष खंडारे (टेरटरी मॅनेजर,बुलढाणा) योगेश येऊल (सेल्स ऑफिसर) तसेच, श्री सुखकर्ता कृषी केंद्र, सूनगांव याचे प्रो. प्रा. श्री गजानन वंडाळे, व प्रफुल कावरे, कृषिमित्र मोहन राजपूत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,,,,
तसेच श्री मधुकर येउल , रवी नानगदे, श्रीराम येउल असे 30 ते 35 शेतकरी उपस्थित असून त्यांना कृषी अधिकारी नावकर साहेब यांनी फवारणी करताना कशी काळजी घ्यावी त्या बद्दल मार्गदर्शन केले, व परिजातच्या डॉ निकिता यांनी शेतकरी बांधवांना प्रोडक्ट बद्दल माहिती दिली… आणि पारिजात इंडस्ट्रीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व उपस्थित शेतकरी बांधवांना सुरक्षा किट वाटप करण्यात आली….