ऍड.योगेश जायभाये बिबी – करोना रुग्णसंख्या कमी होत असतांनाच विरपांग्रा या गावामध्ये ३६ रुग्ण सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे .प्रशासनाने तात्काळ गंभीर पावले उचलण्याची गरज. गावातील नागरिकांना आणखी ही या बाबतीत कुठलीच जागरूकता दिसत नाही आहे. कोरोना बाधित लोक आणखी सुद्धा गावातच आहेत. त्यामुळे इतर गावातील लहान मुले, नागरिक यांना धोका निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासन तसेच तालुका, जिल्हा पातळीवरील प्रशासनाने तात्काळ या बाबतीत पुढील पावले उचलने गरजेचे आहे.
संपूर्ण गावातील ज्या भागात जास्त रुग्ण आहेत त्या भागाला सील करून, गावात पोलीस प्रशासना च्या मदतीने, कोरोनाची चाचणी करणे, तसेच लसीकरण करणे या दोन्ही गोष्टी सोबत राबवणे गरजेचे झालेले असून, यासाठी गावातच कॅम्प ठेवणे गरजेचे असून,गावातील सर्व नागरिकांनी सुदधा यासाठी सहकार्य करून, जास्तीत जास्त चाचणी आणि लसीकरण करून घेणे गरजेचे आहे…
RT- PCR टेस्ट सोबत, प्रशासनाकडून, लसीकरण करणे तसेच गावातील कोरोना बाधित रुग्ण यांना तात्काळ रुग्णालयात पाठवणे अत्यंत गरजेचे आहे,विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे, आणि प्रशासना कडून कुठलीच खबरदारी आणखी सुदधा झालेली नाही आणखी जवळपास 20 कोरोना बाधित रुग्ण गावातच अगदी मनमोकळे पणाने फिरत असल्याचा अंदाज आहे, सर्वांना भेटणे, इतर लोकांच्या घरी जाणे असे सर्व उद्योग मनाप्रमाणे सुरू आहेत प्रशासनासोबतच जनतेनेही काळजी घेणे गरजेचे आहे .