Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मान्सूनच्या लहरीत अडकला बळीराजा ,चार मंडळात पेरण्या,तीन मंडळात पेरण्या खोळम्बल्या.

सिंदखेडराजा(सचिन मांटे) – तालुक्यात मुर्ग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामावर जोर देऊन काही शेतकऱ्यांनी बैलजोडीने तर काही नी ट्रॅक्टरद्वारे पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपून पेरणी करता सज्ज होऊन चार मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली तर तीन मंडळातील खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाच्या लहरीपणामुळे पेरण्या खोळंबल्या असल्याचे वास्तव चित्र आहे.सिंदखेडराजा, सोनोशी, किनगावराजा, दुसरबीड मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा.असे एकूण सात मंडळे आहेत .आज पर्यंत प्रत्यक्षात झालेले प्रजन्यमान हे सिंदखेडराजा मंडळात १८४ मी.मी ,सोनोशी १५९ मी.मी शेंदुर्जन २२० मि.मी,साखरखेर्डा २९६ मि.मी, किनगावराजा ६६ मि.मी, मलकापूर पांग्रा, १०७ मी. मी, दुसरबीड ९६ मि.मी असे पर्जन्यमान आहे त्यामुळे

RAIN


सिंदखेडराजा,सोनोशी साखरखेर्डा शेंदुर्जन या चार मंडळातील गाव शिवारातील पेरणी झाली असल्याचे दिसून येते तर दुसरबीड,किनगावराजा मलकापूरपांग्रा या मंडळातील गाव शिवारात सरासरी पाऊस कमी झालेला दिसत असल्याने येथील पेरण्या खोळंबल्या आहेत गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे कपाशी व सोयाबीन ला लागलेला खर्च वसूल झाला तसेच सोयाबीन सडून गेल्याने सोयाबीनचे घरगुती बियाणे शेतकर्‍यांकडे नसल्याने बळीराजाने महागडे बी बियाणे, रासायनिक खते,आणून पेरणी केली परंतु काही दिवसापासून पावसाचा लपंडाव कडकडीत ऊन पडत असल्याने अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या परंतु पाऊस नसल्याने त्यांच्या पेरण्या उलटणार असल्याने त्यातच सोयाबीनचा बियाण्याचा प्रचंड तुटवडा असल्याने आता पुन्हा पेरणीसाठी बियाणे आणायची कुठून? असा प्रश्न बळीराजा पुढे उभा ठाकला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या अद्याप पेरण्यात न झाल्याने पाऊस येईल कधी पेरणी होईल कधी?या विवंचनेत असल्याने ते चिंतातूर झाले असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.