Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना अलर्ट : प्राप्त 2571 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 23 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि . 6 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2594 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2571 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 6 व रॅपीड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून  468 तर रॅपिड टेस्टमधील 2103 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2571 अहवाल निगेटीव्ह आहेत.     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  जळगांव जामोद तालुका : उटी 1, आसलगाव 1, मडाखेड खू 1,  शेगांव तालुका : गौलखेड 1, चिखली शहर :2,  चिखली तालुका : बेराळा 11, उन्द्री 1, कटोडा 1, मेहकर शहर :1, संग्रामपूर तालुका: सोनाळा पिंपरी 1, दे. राजा तालुका : दे. मही 1, मलकापूर शहर :1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. 

COVIDE 19

अशाप्रकारे जिल्ह्यात 23 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान स्त्री रुग्णालय येथे बजरंग नगर, बुलडाणा येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.       तसेच आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.     तसेच आजपर्यंत 588046 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86164 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86164 आहे.   आज रोजी 1147 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 588046 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86993 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86164 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 165 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.