Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोविडमुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांचे काळजी व संरक्षणासाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी

बुलडाणा : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या बालकांच्या पाल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र संबंधित नगर परिषदेकडून बाल कल्याण समितीला सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे. तसेच  पोलीस विभागाच्या वतीने 0 ते 18 वयोगटातील बालकांना काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने सहकार्य करावे व बाल कल्याण समितीला सादर करावे.  याप्रकरणी अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.

BULDANA

   जिल्हाधिकारी कार्यालयात कोविडमुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या बालकांप्रकरणी जिल्हा कृती दलाची आढावा बैठक आज 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक महेंद्र बनसोड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड आरिफ सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. रामरामे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, महिला व बालविकास अधिकारी श्री. मारवाडी, बाल संरक्षण अधिकारी श्री. मराठे आदी उपस्थित होते.

   जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे समवेत चाईल्ड लाईन यांनी 1098 हेल्पलाईनची प्रचार करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, याबाबत विविध कार्यालयात आयईसी साहित्य, पोस्टर्स लावावेत. या हेल्पलाईनचा प्रचार- प्रसार करावा. संबंधित विभागाच्यावतीने कोविड दरम्यानची माहिती सविस्तरपणे शहानिशा करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कार्यालयात सादर करावी. त्याचप्रमाणे कोविड दरम्यान अनाथ झालेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांच्या संपत्तीचे हस्तांतरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा यांचे वरिष्ठ सरकारी वकीलांच्या मार्गदर्शनाखाली संपत्तीचे बाबत निर्णय घेण्यात यावा.

कोविड काळातील जिल्ह्यातील बालकांची स्थिती

कोविडमुळे अनाथ झालेली बालके 10 (मुले 4 व मुली 6), एक पालक झालेले बालकांची संख्या 272 (मुले 146 व मुली 126), बाल कल्याण समिती मार्फत गृह चौकशी आदेश 223, सामाजिक गृह चौकशी करण्यात आलेल्या बालकांची संख्या 223, बाल कल्याण समितीमार्फत समक्ष सादर करण्यात आलेल्या बालकांची संख्या 49, बाल कल्याण समितीमार्फत एक पालक असलेल्या आणि ताबा घेतलेल्या बालकांची संख्या 40 व अनाथ बालकांची संख्या 9.   

Leave A Reply

Your email address will not be published.