Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यात आज ३५ पॉझिटिव्ह ..आठ तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या निरंक आनंदाने हुरळून न जाता, काळजी घेण्याची गरज ..

सिंदखेडराजा :- आज दि. १५ जून, मंगळवारी हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ३१०० कोरोना अहवालामध्ये एकूण ३५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ०१ कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना चाचणी अहवालात बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. ती संख्या १४ एवढी आहे.
तर खामगाव, शेगाव, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मेहकर, मलकापूर, नांदुरा, मोताळा ह्या आठ तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नसल्याचे चित्र आहे.
उर्वरित पाच तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या खाली दिल्याप्रमाणे आहे.

COVIDE UPDATE 19


बुलडाणा १४
चिखली १०
जळगाव जामोद ०८
लोणार ०२
संग्रामपूर ०१
ही माहिती फक्त आजची आहे, ती बघितल्यावर आपण सगळे हुरळून जाणार नाही. तर अधिक काळजी घेऊन ही संख्या वाढणार नाही, यासाठी कटिबद्ध असणार आहेत. याबद्दल खात्री आहे. मात्र जे कुणी बिनधास्त होतील, त्यांना वेळोवेळी जाणीव देण्याची जबाबदारी आपण घेणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.