शेगाव प्रतिनिधी – जवळा पळसखेड येथे शासनचे घरकुल योजना राबविन्यात येत आहे. परंतु आवश्यकता असणारे कुटुंबांना अजून पर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नसून अनेक कुटुंबं घरकुला पासून वंचीत आहेत. शासनाचा हेतू हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असण्याऱ्या कुटूंबियांना घरकुल मिळावे हा आहे.आधीच आर्थिक दृष्ट्या कमकुत असणारे कुटूंबिय त्यातच भर म्हणून जवळा पळसखेळ येथे 15 जुलै 2020 ला निसर्गाचा झालेला प्रकोप या महापुरमध्ये अनेक घरे वाहून गेले. अनेक घराची पाळझळ झाली अश्या कुटूंबाना घरकुल मिळणे अपेक्षित होते. परंतु असे होतांना दिसत नाही. ज्याचे घर महापूरा मध्ये वाहून गेले अश्या ११ कुटूंबानां अजून पर्यंत नुकसान भरपाई मिळाले तर नाहीच आणि शासनाच्या राबविण्यात येणारे घरकुल योजना पासून देखूल हे कुटूंबीय वंचीत आहे .

दिव्यांग कुटूंबीयांना, व ज्या घरातील कर्ता पुरुष हयात नाही. ज्यांचा घरातील कुटूंबायातील शसकीय नोकरी वर्ती कोणी नाही व मजुरी करतात अशा कुटुंबीयांना घरकुलयोजनाचा लाभ देण्यात यावेअन्यथा आपल्या कार्यालयावर घरकुला पासून विंचित असणाऱ्या कुटूंबीयांना घेऊन कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची पंचायत समिती प्रशासनाने नोद घ्यावी. अश्या अश्या तऱ्हेचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे दिले आहे.