Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्यात एकाचा मृत्यू तर 53 पॉझिटिव्ह

बुलडाणा दि.11 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3816 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3763 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 28 व रॅपीड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 503 तर रॅपिड टेस्टमधील 3260 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3763 अहवाल निगेटीव्ह आहेत.

covide 19
 पॉझीटीव्ह आलेले पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर :5, बुलडाणा तालुका : अजिसपूर 2, तराडखेड 1, कोलवड 1, पाडळी 1,  रायपूर 2,     मलकापूर शहर :5 , मलकापूर तालुका : आळंद 2,   मोताळा तालुका : पिंप्री गवळी 1,  सिं. राजा शहर : 1,   सिं. राजा तालुका : भंडारी 2,   दे. राजा शहर : 1,   दे. राजा तालुका : जांभोरा 1,   खामगांव शहर : 3, खामगांव तालुका : कुंबेफळ 1,    चिखली शहर : 2,  चिखली तालुका : कोलारा 1,   शेगांव तालुका : डोंगरगाव 1,       मेहकर तालुका :  मोहतखेड 1, हिवरखेड 2, खळेगांव 1, घाटबोरी 1,  मोसंबेवाडी 1, शेलगाव काकडे 1,   जळगांव जामोद तालुका : पिं. काळे 2, मानेगांव 2, दादगांव 1,   नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : निमगांव 1,  लोणार तालुका : सुलतानपूर 2, सावरगांव मुंढे 3   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान तळणी ता. मोताळा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

  तसेच आज 112 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.   

आज रोजी 1724 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 522146 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85878 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 84831 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 406 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 641 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

तसेच आजपर्यंत 522146 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 84831 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 84831 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.