शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना मेहकर आमदार संजय रायमुलकर यांनी काल मुंबई येथे कोवीड टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने यांची भेट घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड परिस्थितीवर चर्चा केली.
बुलढाणा जिल्ह्यात कोवीड परिस्थिती हळूहळू कमी होत असली तरी अद्यापही धोका आहे.काल खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी कोवीड महाराष्ट्र टास्क फोर्स समिती अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील कोवीड ची परिस्थिती , यंत्रसामग्री, उपलब्ध सुविधा,औषधांचा तुटवडा व उपलब्धता , आवश्यक उपाययोजना व लहान मुलांना कोरोना झाल्यावर करावयाच्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बाबत सविस्तर केली.