Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यात युवकांचे संघटन उभे करावे

सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यात युवकांचे संघटन उभे करावे

माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे प्रतिपादन

सिंदखेडराजा शहर प्रतिनिधी तारीख 9

माळी समाज हा प्रामाणिक व इमानदार आहे दिलेला शब्द पाळतो. गेल्या अनेक वर्षापासून हा समाज माझ्यासोबत आहे त्यामुळेच यापूर्वी मी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब यांना माजी आमदार कृष्णराव इंगळे यांना लोकसभेची उमेदवारी द्यायला लावली होती. कारण त्यांच्या माध्यमातून माळी समाजाला न्याय मिळेल मात्र त्यामध्ये आम्हाला यश येऊ शकले नाही. कृष्णराव इंगळे यांचा पराभव झाला. माझा सुद्धा लोकसभेत दोनदा पराभव झाला परंतु आता मी पाचव्यांदा आमदार आहे. आणि या माझ्या राजकीय आयुष्यामध्ये माळी समाजाचा मोठा वाटा आहे त्यामुळे यापूर्वी सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिथे जिथे माळी समाजाची संख्या आहे तिथे तिथे त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि भविष्यात सुद्धा प्रामाणिकपणे न्याय देऊ.सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे आता आमच्या सोबत आहे. राष्ट्रवादी मध्ये आहे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सावता परिषदेमध्ये युवकाचे संघटन उभे करावे कारण क्रांती युवकच करू शकतो असे प्रतिपादन त्यांनी केले तारीख 8 नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा येथे आयोजित सावता परिषदेच्या संपर्क अभियान समारोप कार्यक्रमात व माळी समाज मेळाव्यात त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.

Dr shigane

पुढे बोलताना आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले संत सावता महाराज यांचे कार्य महान आहे त्यांनी दाखवून दिलेल्या कर्मवादी मार्गावर माळी समाजाची वाटचाल सुरू आहे. या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले सावता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते राजीव काळे म्हणाले महाराष्ट्रात एकूण 288 आमदार आहे आणि आमचा समाज लोकसंख्येच्या दृष्टीने राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे आमचे मतदान असतांना विधानसभेत आमदाराचा दोन अंकी आकडा सुद्धा आमचा जुळत नाही यापुढे माळी समाजाच्या लोकांनी झेंडे दांडे लावण्याचे काम व चटया टाकण्याचे काम न करता आपल्या राज्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मागावा पुढे बोलतांना ते म्हणाले तुम्ही कोणाच्याही कितीही पुढे पुढे करा मात्र तुम्हाला देत असताना राज्यकर्ते तुमची जात पाहूनच तुम्हाला देतात,भारतातले हे सत्य आहे तुम्हाला जे काही मिळतं ते तुम्ही त्या जातीचे आहे म्हणून आणि जे काही मिळत नाही ते तुम्ही त्या जातीचे नाही म्हणून. म्हणून राजकारणात जात हा महत्त्वाचा फॅक्टर असल्याचे त्यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी म्हणाले माळी समाजाचे माझ्यावर उपकार आहे मुस्लिम समाजाचे दोन नगरसेवक असताना माळी समाजाने मला नगराध्यक्ष पद बहाल केले. सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्याम मेहेत्रे यांना चांगले भविष्य आहे. त्यांच्या प्रयत्नातून एक चांगला सुंदर कार्यक्रम झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनराव मेहेत्रे म्हणाले समाजाच्या लोकांनी समाजासोबत राहिले पाहिजे. कोणी कोणत्याही पक्षात काम करा परंतु समाजाचा विषय आल्यानंतर सर्वांनी एकत्र होणे गरजेचे आहे. न्याय मिळत नसेल तर न्याय हिसकावून घेण्याची क्षमता समाजानी ठेवावी.

कार्यक्रमाचे आयोजक सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ मेहेत्रे यांनी आभार प्रदर्शन करीत असताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब तुम्ही सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांना राज्याची मोठी जबाबदारी द्यावी, तुमचं मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे चांगलं वजन आहे त्यामुळे त्याचा फायदा आमच्या माळी समाजासाठी होऊ द्यावा असे आवाहन केले. तसेच सर्व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार मानले.

या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी कार्यक्रमाचे अध्यक्ष सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर कार्यक्रमाचे मार्गदर्शक सावता परिषद प्रदेश महासचिव मयूर वैद्य मराठवाडा अध्यक्ष शिवानंद झोरे प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सतीश तायडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विष्णू मेहेत्रे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड शिवसेना नेते छगनराव मेहेत्रे माजी नगराध्यक्ष सिताराम चौधरी प्रदेश संघटक संतोष राजगुरू प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी नगरपरिषद उपनगराध्यक्ष विजय तायडे माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे मुंगसाजी बँकेचे अध्यक्ष दिपक देशमाने,सरपंच सुनिल जगताप यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माळी कर्मचारी महासंघाचे संजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्याम मेहेत्रे नगरसेविका सौ सारिका मेहेत्रे युवक आघाडी सावता परिषद जिल्हाध्यक्ष प्रदीप मेहेत्रे जिल्हा संपर्कप्रमुख पवन झोरे यांच्यासह सिंदखेडराजा शहरातील माळी कर्मचारी महासंघ व विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.