Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर
जनतेतून सरपंच…. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालयासाठी राजकारण तापणार!

सिंदखेड राजा ( प्रतिनिधी सचिन मांटे ) – राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील तालुक्यातील ऐन गुलाबी थंडीत 30 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार आहे या निवडणुकी संबंधीत नोटीस १८ नोव्हेंबरला जारी होइल. दरम्यान, १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २० डिसेंबरला निकालाचा गुलाल उधळला जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार तथा निवडणुक अधिकारी सुनील सावंत यांनी सांगितले असून आजपासून आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन यावेळी तहसीलदार सुनील सावंत यांनी केले दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल नायब तहसीलदार डॉ आसमा मुजावर यांच्यासह निवासी नायब तहसीलदार प्रवीण वराडे सुनील धोंडारकर सुनील कुलकर्णी आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत

Grampanchayat

यंदा सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत सदस्याला जरी महत्त्व कमी असले तरी सरपंच पदासाठी मात्र प्रचंड चुरस निर्माण होईल असे चित्र सध्यातरी आहे सिंदखेडराजा तालुक्यातील होणाऱ्या 30 ग्रामपंचायत निवडणुकीचे सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे अनुसूचित जाती करिता सावखेड तेजन, शिवनी टाका ,वरदडी बुद्रुक, धानोरा हे 4 गावे अनुसूचित जाती महिलाकरिता साठेगाव, हिवरखेड पूर्णा ,उमरद ही 3 गाव नागरिकाचा मागास प्रवर्ग जागेसाठी झोटिंगा, केशव शिवणी , तढेगाव ही 3 गाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागेसाठी रताळी, वाघाळा, ताडशिवणी, खैरव, देवखेड ,आडगाव राजा ही 6 गाव सर्वसाधारण जागेसाठी सिंदी, बाळसमुद्र, जऊळका, वाघजई, सावरगाव माळ, चांगेफळ ही 6 गाव सर्वसाधारण पुरुषांकरिता गुंज, पिंपळगाव सोनारा ,सोयंनदेव, पिंपळगाव कुडा, अंजली ,निमगाव वायाळ ,जांभोरा ही7 गावे आणि अनुसूचित जमाती महिला करता रुम्हणा हे 1 गाव अशा प्रकारच्या आरक्षण सरपंच पदाकरिता आहे

निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल :

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.

नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.

मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईलशिंदी रताळी, गुंज, पिंपळगाव सोनारा, बाळसमुद्र ,झोटींगा ,केशव शिवनी, वाघाळा, ताडशिवनी, सोयंदेव, जऊळका, पिंपळगाव कुडा, खैरव, तढेगाव, रूमणा ,देवखेड, वाघजाई, साठेगाव ,अंचली, सावरगाव माळ ,हिवरखेड पूर्णा, निमगाव वायाळ, सावखेड तेजन, शिवनी टाका ,जांभोरा, वरदडी बु , चांगेफळ ,धानोरा, आडगाव राजा ,उमरद

Leave A Reply

Your email address will not be published.