सुनगांव येथिल आदीवासी व मेंढपाळ वस्ती जवळील डम्पिंग ग्राउंड चे विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन
गजानन सोनटक्के जळगाव जा –
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतचा अजब गजब कारभार निदर्शनास आला आहे. एकीकडे शासनाचे नदी स्वच्छ अभियान चालू असताना याउलट गावाजवळीलच आंबे लोन नदीचे उगमस्थान असलेल्या जुना पानी या नाल्यापासुन 500 फुट अंतरावर नदीपात्रा लगत सुनगाव ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंड बनविले आहे.
सुनगाव ग्रामपंचायतने 20 19 मध्ये गावातील केरकचरा जमा करण्यासाठी कचरा गाडी खरेदी केली आहे व दीड ते दोन महिने पासून केरकचरा हा शासनाच्या नियमाप्रमाणे चक्क नदीपात्रा जवळ टाकलेला आहे व गावातील केरकचऱ्याचे सुका व ओला कचरा याचे वर्गीकरण न करता हा संपूर्ण कचरा एकत्रित केल्या जातो.
त्या कचरा मध्ये दवाखान्यातील स्क्रॅप मटेरियल जसे इंजेक्शन सुई व काचेची बॉटल व घरातील केरकचरा यामध्ये प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात असतात हा कचरा ग्रामपंचायतच्या कचरा गाडीमध्ये एकत्रित करून जुना पानी असलेल्या नदी पात्रा जवळ मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे, परिणामी या कचऱ्याची दुर्गंधी जवळ असलेल्या आदिवासी परिसरात पसरत आहे.
कचरा नदीपात्राजवळ असल्याने आदिवासी व परीसरात गुरेढोरे व मेंढपाळ ची जनावरे या कचऱ्यात आपणास काही खायला मिळते का म्हणून कचरा धुंडाळीत असतात परिणामी कचऱ्यात असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या काचेचे बॉटल सुया गुरेढोरे यांच्या तोंडात जाऊन गुरेढोरे मृत्युमुखी पडण्यास कारणीभूत ठरत आहे व पशू पक्षी यांचे जीवनमान दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे.
कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या हवेमुळे परिसरातील शेतीमध्ये पसरत आहे व या नदीपात्रातून भरपूर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे हा कचरा रस्त्यात पसरत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे.
यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे येणाऱ्या काळात पावसामुळे नदीला पूर येऊन परिसरातील कचरा हा नदीमध्ये पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये साचणार आहे परिणामी नदी दुषित होणार आहे.
खालच्या गावातील परिसरात पसरून तेथील नदि पात्र दुषित होणार आहे तरी अशा सुनगाव ग्रामपंचायतकडून पर्यावरणाच्या हानी होणाऱ्या गंभीर बाबीकडे पंचायत समिती प्रशासना कडून योग्य ती कारवाई करावी अशी जुना पानी येथिल आदिवासी व धनगर मेंढपाळ यांनी केली आहे.
सदर डंपिंग ग्राउंड तेथुन न हटवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनोने वआदीवासि / मेंढपाळ यांनी सांगितले.