Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

खत विक्रेत्यांनी खत विक्री जुन्याच दरांनी करावी-कृषी विभागाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.25 : जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आगामी खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. एप्रिल 2021 पासून युरीया वगळता इतर रासायनिक खतांची दरवाढ खत उत्पादक कंपन्यांनी केली होती मात्र केंद्र शासनाने 20 मे 2021 च्या निर्देशानुसार या कंपन्यांना वाढीव किंमतीसाठी अनुदान देण्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे खत विक्रेता दुकानदारांनी खते जुन्याच दराने विक्री करावयाची आहे. तरी काही खत विक्रेते वाढीव दराप्रमाणेच छापील किंमतीवर खते विक्री करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते.

Fertiliser


असे आहेत रासायनिक खत कंपनीचे सुधारीत विक्री दर (प्रति बॅग 50 किलो)
खताचा प्रकार ग्रेड : डिएपी – इफ्फको 1200 रू, जीएसएफसी 1200 रू, जय किसान 1200 रू, कोरोमंडल 1200 रू, महाधन 1200 रू, कृभको 1200 रू, 10:26:26 – इफ्फको 1175 रू, जीएसएफसी 1175 रू, जय किसान 1375 रू, कोरोमंडल 1300 रू, महाधन 1390 रू, कृभको 1300 रू, 12:32:16 – इफ्फको 1185 रू, जीएसएफसी 1185 रू, जय किसान 1310 रू, महाधन 1370 रू, कृभको 1310 रू, 20:20:0:13 – इफ्फको 975 रू, जय किसान 1090 रू, कोरोमंडल 1050 रू, आरसीएफ 975 रू, महाधन 1150 रू, कृभको 1050 रू, 19:19:19 – जय किसान 1575 रू. 28:28:00 – जय किसान 1475 रू, कोरोमंडल 1450 रू, 14:35:14 – जय किसान 1365 रू, कोरोमंडल 1400 रू, 24:24:0:85 – कोरोमंडल 1500 रू, महाधन 1450 रू, 15:15:15:09 – कोरोमंडल 1150 रू, 16:20:0:13 – कोरोमंडल 1000 रू, 15:15:15 – आरसीएफ 1060 रू, 14:28:00 – महाधन 1280 रू, 16:16:16 – महाधन 1125 रू, MOP – कृभको 850 रूपये.
ज्या खत विक्रेत्यांकडे वाढीव दरातील खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यांनी सुधारीत दराप्रमाणेच खते विक्री करावी. शेतकऱ्यांनी सुद्धा सुधारीत दरांप्रमाणेच खते खरेदी करावी. सुधारीत दरांपेक्षा वाढीव दराने खतांची विक्री होत असल्यास किंवा तसे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या संबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील अरूण इंगळे यांच्या 7588619505 आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद बुलडाणा येथील विजय खोंदील यांच्या 7588041008 मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन खते परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.