पाच ते सहा दिवसापासून ग्रामपंचायत चा महाजल पाणीपुरवठा ठप्प
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे कार्यरत असलेली महाजल पाणी पुरवठा योजना ही आठ ते दहा वर्षापासून कार्यान्वित आहे परंतु वेळोवेळी निकृष्ट दर्जाची केलेली पाईपलाईन ही फुटत राहते त्यामुळे या योजनेची पाईपलाईन ही शेतकऱ्यांच्या शेतात वेळोवेळी फुटत राहते व पाच सहा दिवसापासून पाण्याच्या टाकीजवळ फुटलेली पाईपलाईन ही नादुरुस्त अवस्थेतच पडलेली आहे फुटलेली पाईपलाईन ही वेळीच का ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून दुरुस्त होत नाही त्यामुळे सुनगाव येथील नागरिकांचे ऐन उन्हाळ्याची सुरुवात असताना पाण्यासाठी हाल होत आहे.भंडारामहोत्सवात आलेल्या पाहुण्यांना काय वाटले असेल याचा विचार ग्रामपंचायत प्रशासनाने करावा व नेहमीच फुटत असलेली महाजल पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन बदलण्याची कींवा संपूर्ण गावाला १४० गाव पाणीपुरवठा योजनेव्दारे पाणी पुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासुन गावकरी शुद्ध पाणी मिळावे याकरिता हेलपाटे मारत असुन संबंधित ग्रामपंचायत व गावातील सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी यांनी लक्ष घालून गावाची मागणी पुर्ण करावी.. जेणेकरून गावकऱ्यांना शुध्द क्षारमुक्त पाणी पिण्यासाठी मिळेल..