सुनगांव येथे माजी विद्यार्थी व शिक्षकांचा मेळावा संपन्न…
गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथून जवळच असलेल्या निसर्गरम्य सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षनाथ महाराज मंदिर येथे दिनांक१३ फेब्रुवारी रोजी सन १९९४-९५ मध्ये सुनगांव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक पी.आर.जाधव तर प्रमुख उपस्थितीत माजी शिक्षक राजाभाऊ कोकाटे यांची उपस्थिती लाभली.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माजी विद्यार्थी व परीवार यांनी सुनगावचे आराध्य दैवत आवजीसिध्द महाराज व गोरक्षनाथ महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन केले.त्यानंतर माजी विद्यार्थी शंकर हिस्सल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आप-आपला परिचय दिला. केल्या 28 वर्षानंतर माजी विद्यार्थी प्रथमच एकत्र आल्यामुळे वातावरण खूपच उत्साही आनंदी व भावुक झाले होते. सर्वच माजी विद्यार्थी आपुलकीने एकमेकांची विचारपूस करीत होते तसेच गेल्या 28 वर्षांपूर्वीच्या शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा दिला. कार्यक्रमाचे पासून स्थानिक कैलास कापरे पुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैभव धुळे यांनी केले. यावेळी मेळाव्यात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवजिसिद्ध महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. या पूजनानंतर कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी आशिष केला, प्रेमसिंग पवार,गजानन कापरे,राजाराम धुळे,देवेंद्र जोशी,रामदास वसुले,कैलास हिस्सल,शत्रुघ्न ताडे,रमेश धुळे, महेंद्र पालीवाल,शंकर हिस्सल, मनोहर केदार, सविता भटकर,वैशाली सोनोने, अनिता कोथळकार,विमल ढगे, विमल रंदळे,पार्वती ढगे,संगीता भुते यांनीनी परिश्रम घेतले…