सुनगाव ग्रामपंचायत ची कचरा घंटागाडी आठ दहा दिवसापासून बंद
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सूनगाव ग्रामपंचायतला दोन ते तीन वर्षापूर्वी घंटागाडी मिळालेली आहे या गाडीचा उपयोग हा सूनगाव येथील ग्रामपंचायत सफाई कामगार गावातील केरकचरा जमा करण्यासाठी दररोज गावात फिरवित असतात परंतु सुनगाव येथे 12 फेब्रुवारी रोजी असलेल्या महोत्सवा नंतर सुनगाव येथे कचरा गाडी ही आठ ते दहा दिवसापासून गावात फिरलीच नाही त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पसरलेले दिसत आहे व साफसफाईच्या दृष्टीने सुनगाव येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे सुनगाव येथे वारंवार होत असलेल्या ग्रामसेवक बदली व प्रभारी ग्रामसेवक यांच्या नाकर्तेपणामुळे गावातील वसुली पाणी कर दिवाबत्ती कर इत्यादी कर ग्रामपंचायतला वसुली हे बरीच कमी झालेली आहे त्यामुळे सामान्य फंडातील खर्च हा ग्रामपंचायत प्रशासनाकडून धुमधडाक्याने होऊन सामान्य फंड बऱ्याच प्रमाणात रिकामा झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे सामान्य फंडातून होत असलेली कामे जसे साफसफाई नालेसाफसफाई कचरा गाडीचे डिझेल व मेन्टेनन्स व सुनगाव उसरा चालठाणा येथे लावलेले हायमास्ट हे एक ते दीड वर्षापासून नादुरुस्तच आहेत त्याची कारणे सामान नसणे किंवा कारागीर नसणे असे विविध कारणे सरपंच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे परंतु सदर कामे ही गाव हिताच्या दृष्टीने व लोकांच्या मूलभूत सुविधा येत असल्यामुळे येथील नागरिकांना या सवलतींपासून वंचित राहावे लागत आहे तसेच सुनगाव ग्रामपंचायत ची कचरा गाडी ही ग्रामपंचायत मध्ये दहा बारा दिवसापासून एकाच जागेवर उभी आहे त्याचे कारण काय तर गाडीमध्ये डिझेल नसल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले तरी या सर्व होत असलेल्या दुर्लक्षित व गैर कारभाराची पंचायत समिती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन योग्य ते कारवाई करण्यात यावे अशी सूनगाव येथील नागरिकांची मागणी आहे