Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मधमाशांचा हल्ल्यात नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी जखमी ..

मधमाशांचा हल्ल्यात नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी जखमी ..

सिंदखेडराजा:- लग्न लावण्यासाठी परण्या काढत वरात घेऊन लग्नस्थळी जाणाऱ्या वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी तालुक्यातील दुसरबीड येथे आज दि.२७ फेब्रुवारी, सोमवारी घडली. या घटनेत वऱ्हाडसह नवरदेव जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात आयोजित आज एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तालुक्यातीलच किनगावराजा येथील फुलसिंग देव्हरे यांचा मुलगा वर मंगेश फुलसिंग देव्हरे ह्याचा शुभ विवाह दुसरबीड येथीलच बबन बिथरे यांची मुलगी वधू गंगा बबन बिथरे हिच्यासोबत होणार होता. त्यादरम्यान किनगावराजा येथून नवरदेवाची वऱ्हाडी मांडली दुसरबीड येथे पोहोचली. मंगल कार्यालयात सर्व सोपस्कार व विधी झाल्यावर सायंकाळी परण्याची वरात वाजत गाजत मंगल कार्यालयातून निघाली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५.३० वा. सुमारास ही वरात लग्न लावण्यासाठी परत मंगल कार्यालयाकडे जात असतांनाच मार्गावरील बाभूळ बनात बँडच्या वाद्याच्या आवाजाने झाडावरील आग्या मोहोळाचे पोळे त्या वऱ्हाडी मंडळीच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्या ह्या घटनेत मधमाशांनी वऱ्हाडी मंडळी तसेच नवरदेवावर हल्ला चढवला. त्यात वऱ्हाडी मंडळी तर बाधित झालीच तर नवरदेव सुद्धा जखमी झाला. एवढेच नव्हेतर नवरदेव ज्या घोड्यावर स्वार होऊन जात होता. त्या घोड्याला व त्याची लगाम खेचणाऱ्या मालकाला सुद्धा मधमाशांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. त्यावेळी प्रसंगावधान राखत नवरदेव मंगेश ह्याला जवळच्या एका खाजगी दवाखान्यात भरती करावे लागले. याच घटनेत सुमारे २५० वऱ्हाड्यांना मधमाशांच्या चाव्याने ग्रस्त केल असल्याचे व त्यानंतर ७.०० वा. सुमारास नवरदेवाला लग्नस्थळी आणत लग्न लावण्यात आले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ह्या घटनेमुळे परिसरात विविध प्रकारच्या चर्चांना पेव फुटले आहे, एवढे मात्र खरे ..

Dusarbid
Leave A Reply

Your email address will not be published.