अवैध शौचालय बांधकामाबाबात दादुलगाव ग्रामपंचायतीची धडाकेबाज कार्यवाही,,,
गजानन सोनटक्के
जळगाव जा
जा :-तालुक्यातील दादुलगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गौलखेड येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील सरकारी जागेवर होत असलेले अवैध शौचालय बांधकाम तत्काळ थांबवण्यासाबाब ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गौलखेड गावच्या मध्यभागी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.पुतळ्यासमोरील जागेला लागूनच असलेल्या सरकारी जागेवर त्याच गावातील रहिवासी असलेले राजेंद्र प्रकाष रणीत यांनी अवैधपणे शौचालयाचे बांधकाम सुरू केले होते.याबाबत सागरकुमार झनके यांनी ६ मार्च रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील जागेवर अवैधपणे होत असलेले शौचालयाचे बांधकाम तत्काळ थांबवण्याबाबत ग्रामपंचायत प्रशसनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.त्याबाबतच्या बातम्या विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. सदर घटणेची गांभीर्याने दखल घेत ग्रामसेवक अनिल अंबडकर यांनी ११ मार्च रोजी गौलखेड येथे भेट दिली असता,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जागेलगत असलेल्या सरकारी जागेवर अवैधपणे शौचालयाचे बांधकाम केलेले आढळून आले.त्यामुळे त्यांनी त्याबाबत संबधीत व्यक्तीला तत्काळ सुरू असलेले अवैध बांधकाम बांधकाम थांबवून,आजपावेतो केलेले बांधकाम काढून घेण्यास सांगीतले तसेच,तुमच्या अशा कृत्यामुळे ग्रामपंचायतीची बदणामी झाली असून आपण तत्काळ ते अतीक्रमण काढून टाकवे अन्यथा आपणाविरद्ध म.ग्रा.अधिनियम १९५९ कलम ५३ नूसार कार्यवाही करण्यात येईल,व वेळ प्रसंगी सर्व अतीक्रमण ग्रामपंचायत स्वतःहून तोडून टाकेल व यासाठी येणारासर्व खर्च आपणाकडून वसूल करण्यात येईल, त्याबाबचे लेखी आदेश राजेंद्र प्रकाष रणीत यांना देण्यात आले आहे.
