१९ वर्षाखालील भारतीय कबड्डी संघाचे सुवर्ण यश. चार खेळाडूंचा विजयी संघात समावेश..!!
विजयी खेळाडूंचा सूनगाव येथे भव्य सत्कार
गजानन सोनटक्के
नेपाळ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले, या विजयी संघात जळगांव जामोद तालुक्यातील प्रथमेश गजानन धुळे सूनगाव कुणाल वसंत भोंडे, अनुप विनोद भोंडे रा. जामोद, प्रसन्न शिंगणापुरे रा. टुनकी यांचा संघात समावेश होता. देश पातळीवर या खेळाडूने जळगाव जामोद तालुक्यातील नाव लौकिक केलेले आहे
या सर्व खेळाडूंचे 10 एप्रिल रोजी सूनगाव भव्य सत्कार सभांरभ आयोजित केला होता त्या आनंदात सुनगाव गावकऱ्यांनी या सर्व खेळाडूंची ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली व नंतर नागवेली चौक येथे सत्कार आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम या विजयी खेळाडूंनी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर या विजय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला सूनगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सभापती माजी पंचायत समिती उपसभापती ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी विजयी खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कुमारी प्रांजली मिसाळ हिने दहाव्या वर्गात मराठी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवल्यामुळे तिचा सुद्धा सत्कार करण्यात आला ह्या सत्काराचे आयोजन जय शिवराय प्रतिष्ठान चे ऋषी येउल गणेश वसुले राजेश येऊल रवी घोलप निखिल वंडाळे व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावकरी मंडळींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले