Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

किनगांवराजा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

किनगांवराजा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन

सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे ).दि १२.४.२०२३.
किनगाव राजा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त किनगांवराजा येथे दि.१२ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ९ ते ४ दुपारी या वेळेत रक्तदान शिबीर पार पडले…
या रक्तदान शिबिराचे आयोजन जायंटस ग्रुप आँफ किनगांवराजा व भिमक्रांती युवा ग्रुप किनगांवराजा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त डॉ पातुरकर यांचे वेदांत क्लिनिक,हिवरखेड रोड येथे आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये दत्ताजी भाले रक्तकेंद्र, डाँ हेडगेवार रूग्णालय,छत्रपती संभाजीनगर,,यांनी रक्तसंकलन केले,,,सदर शिबिरात एकूण ४५ दात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले.. शिबीर यशस्वी करण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ किनगांव राजा चे अध्यक्ष श्री अविनाश राजे जाधव सर,उपाध्यक्ष सचिन मांटे,
श्रीमंत राऊत, सचिव डॉ ज्ञानेश्वर पातुरकर तसेच भिमक्रांती युवा ग्रुपचे अमोल साळवे, मार्गदर्शक श्री.राजेश काकडे व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.शिबीर स्थळी किनगांवराजाचे मान्यवर व पत्रकार गजानन काळूसे तसेच जायंटस ग्रुप चे देऊळगांव राजा येथील सक्रीय ज्येष्ठ सदस्य श्री पुरुषोत्तम धन्नावत,श्री जुगलकिशोर हरकूट,श्री सन्मती जैन यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले.

Sachin manthe
Leave A Reply

Your email address will not be published.