वार्ड नंबर 6 मध्ये नाली व रोड बांधकामाची मागणी
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नंबर सहा हा विकासापासून वंचित असण्याचे चित्र सुनगाव येथे दिसत आहे येथील वार्ड नंबर सहा मधील सुधाकर कंटाळे ते सुनील इंगळे यांच्या घराजवळील रस्त्यामध्ये अद्यापही ग्रामपंचायतने सांडपाण्याची व्यवस्था केलेली नाही व कोणत्याच प्रकारचे रोडचे व नाली बांधकाम केलेले नाही व त्यामुळे नागरिकांना जाण्यास त्रास होत आहे या रस्त्यावर घाण पडलेली आहे व सांडपाण्याच्या नालीची व्यवस्था नसल्यामुळे सांडपाण्याचे पाणी हे रस्त्यावर वाहत आहे त्यामध्ये रस्त्याने मुलांना व नागरिकांना चालता येत नाही परिणामी हे पानि रस्त्यावर साचून त्यामध्ये डास व इतर रोग पर्सविणारे जिवाणू जीवांचे निर्मिती होत आहे तरी येथील नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे व येथील नागरिक विनोद इंगळे व निर्मलाबाई ढगे यांनी वार्ड सदस्य यांना वेळोवेळी सांगूनही कोणत्या प्रकारची दखल घेतल्या जात नाही तरी याकडे ग्रामपंचायतने लक्ष द्यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे या वार्डामध्ये कौशल्या दिनेश ढगे गजानन गणपत दातीर बळीराम धुळे हे वाड मेंबर आहेत तरी यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असा आरोप येथील राहणारे विनोद इंगळे यांनी केला आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घ्यावी
Related Posts