Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

15 सप्टेंबर रोजी असलेल्या शेतकरी शेतमजूर यांच्या दुष्काळ दखल मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हा प्रशांत डिक्कर यांचे आवाहन

Gajanan sonttake

15 सप्टेंबर रोजी असलेल्या शेतकरी शेतमजूर यांच्या दुष्काळ दखल मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी व्हा प्रशांत डिक्कर यांचे आवाहन

गजानन सोनटक्के जळगाव जा

प्रमुख मागण्या
१) विमा कंपनिने विना अट शेतकऱ्यांना पिक-विमा द्यावा.
२) जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी.
३) राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून शेतमजुरांना सर्व सुविधा लागु कराव्यात.
४) पि.एम.किसान स्नमान निधी योजनेच्या धरतीवर शेतमजुरांना दरमहा ४ हजार रुपये मानधन लागु करा.
राज्यातील शेतकरी शेतमजूरावर सतत येत असलेल्या नैसर्गिक संकटामुळे सर्व शेतकरी शेतमजूर भयभित व असुरक्षित झाला आहे. त्यामुळे आलेल्या या नैराश्यातुन शेतकरी, शेतमजूरांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. याकरिता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या प्रमाणे आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर निवेदनातील खालील मागण्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

यावर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. वेळोवेळी पडलेला मुसळधार पाऊसामुळे शेकडो एकर जमिनी खरडुन गेल्या. येवढ्यावरच न थांबता पाऊस सतत सुरू राहल्याने पिकांची वाढ खुटली. वाण किळीने लाखो एकरातील सोयाबीन सारखे पिके फस्त केली. कापूस, सोयाबीन,तुर, ज्वारी, उडिद,मुंग इत्यादी पिकासह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी शेतमजूर विवंचनेत आला आहे. त्याकरिता सरकारने बुलढाणा जिल्ह्यत ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना भरिव नूकसान भरपाई द्यावी.

तसेच नैसर्गिक संकटाने शेतमजूर चिंताग्रस्त आहे. महागाईचा आकडा गगणाला भिडला आहे. त्यामुळे शेतमजुरी करुनही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. आरोग्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, विश्व दारिद्र्य आले असल्याने मुला मुलिचे थांबलेले लग्ण, कायम असलेला अन्नधान्न्याचा तुटवडा, त्यामुळे माणसिकतेने खचुन गेले असल्याने मरणाचे संकट या सर्व सकंटाचा सामना कसा करावा हा महत्त्वाचा प्रश्न शेतमजूरांसमोर ठासुन उभा आहे. करीता राज्यातील शेतमजुरांना चिंतामुक्त करुन स्वाभिमानाने जगता यावे यासाठी सरकारने राज्यात स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करुन शेतमजुरांना सर्व सवलती लागु कराव्यात. पि.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना दरमहा ४ हजार रुपये मानधन लागु करावे. ह्या वरील मागण्याची केंद्र आणि राज्यसरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. व शेतकरी, शेतमजुरांना न्याय द्यावा. याबाबत सरकारला जाणीव व्हावी यासाठी दि. १५ संप्टेबर २०२२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजु शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर संग्रामपूर तहसील कार्यालयावर धडकणार. असल्याने या मोर्चात सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.