सुनगाव येथे भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण..
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजन …
वृक्षवल्ली आम्हा सोयरे च्या निनादाने दुमदुमली सूनगावनगरी….
गजानन सोनटक्के
जळगाव जा
देशभर सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र दिन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुनगाव येथे सामाजिक वनीकरण विभाग च्या पुढाकाराने सर्व शासकीय विभाग व ग्रामपंचायत सुनगाव यांना सोबत घेत भव्य वृक्षदिंडी, रोपवाटप व वृक्षरोपण चा भव्य हरित सोहळा आयोजित करण्यात आला .सुनगाव हे गाव कायम विविध निसर्गपूरक उपक्रम राबवत असल्याने या सोहळ्या चे आयोजनसाठी अधिकारी वर्गाने निवडले.
येथील जि. प .मराठी शाळा व मा.न. विद्यालय सुनगाव सह आय.टी.आय. जळगाव जा.या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पारंपारिक वेशभूषेत तयार होत गावातून भव्य वृक्षदिंडी व हरीतप्रभातफेरी चे आयोजन दी 4 ला करण्यात आले .
जि.प .शाळा येथून सुरू झालेली ही फेरी गावभर वृक्षांची लागवडीचे महत्त्व समजावून सांगत व वृक्षदिंडीतून वृक्षाला देवस्थानी गावभर मिरवून हर्ष उल्हासात नारे लावत, नाचत,गात फिरवण्यात आली.
यावेळी तालुक्यातून बरेचसे पर्यावरण प्रेमी,राजकिय नेते, व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. वृक्षदिंडीच्या प्रमुख आकर्षणात विविध पानाफुलांनी सजवलेली व पालखी व त्यात सजवलेला देवरूपी वृक्ष सर्वांच्या आकर्षण ठरत होता. वृक्षदिंडीत निसर्गावर आधारित भजने व अभंग म्हणून म्हणण्यासाठी गावातील वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ ,श्री गजानन भक्त मंडळ,व गायत्री परिवाराचे भाविक ,सातपुडा बचाव समिती,वनसैनीक,जलयोधे,
तसेच इतर धार्मिक व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मदत केली या दिंडीच्या सुरुवातीला वनविभागाची तर शेवटी पोलीस विभागाची वाहन शोभा वाढवत होते. गावातील नागरिकांनी स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव असलेला 75 वर्षे पूर्ण करणारा स्वातंत्र्यदिन असणारा पंधरवाडा अगदी दिवाळी सारखा साजरा करण्याचे ठरवलेले दिसले. जागोजागी महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून व पताका बांधून वृक्षदिंडी चे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी रस्त्याने निसर्ग व पर्यावरणावर आधारित नारेबाजी ,नृत्य, नाटिका, इत्यादी सादर केले. आधीच पर्यावरणाला देव मानणारे हे सूनगाव आपल्या निसर्ग प्रेमासाठी जिल्हाभर प्रसिद्ध आहे .मागे झालेल्या जलसंवर्धनाच्या चळवळी, सातपुडा बचाव ची आंदोलने, व अतिशय हट्टाने केलेली उंबरदेव ते कुवरदेव या पट्टयातील सातपुड्याची जपणूक हे गाव करत असून भविष्यात अधिकाधिक जंगल सांभाळणे व वाढवण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. दिंडीनंतर या फेरीचे रूपांतर सभेत होऊन त्या ठिकाणी उपस्थिततांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हातून वृक्ष लागवड करून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर संजय कुटे ,
एसडीओ सौ देवकर, तहसीलदार सोलाट मॅडम ,
बीडीओ भारसाकळे सर ,
कृषी अधिकारी वाकोडे सर, आर एफ ओ पाटील मॅडम, पीएसआय भास्कर साहेब, सरपंच अंबडकर ,
जि .प. सदस्य काळपांडे पं.स. उपसभापती महादेव धुरडे, पत्रकार राजकुमार भड, इत्यादी मान्यवर उपस्थित राहून आमदार श्री संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे याच व्यासपीठावर अमृत महोत्सवी उत्सवाचा गाभा असलेला राष्ट्रध्वज
व हर घर तिरंगा चे प्रतिनिधिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेचे प्रस्तावना आर .एफ. ओ. पाटील मॅडम ,संचालन तलाठी जी. डी. वाघ यांनी,
तर आभार प्रवीण धर्मे यांनी मानले .याप्रसंगी श्री दत्ता पाटिल,सौ.पंचफुलाताई वंडाळे,सूरेश अंबड़कार ,मोहनसींग,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील दोन्ही शाळा ,भजनी मंडळ ,वारकरी मंडळ, अंगणवाडी सेविका ,
आशासेविका ,ग्रामपंचायत कर्मचारी , वन कर्मचारी,रोजगार हमी सेवक,
सर्व बचतगट, गायत्री परिवार तालुक्याचे सर्व शासकीय विभाग मधे सामाजिक वनीकरण,वनविभाग,पंचायत समिती,महसूल,तहसिल,पोलिस,कृषी,इत्यादी सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सुनगाव ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.
एकंदरीत या सोहळ्याने तालुक्यात एक हरीतलाट तयार झालेली दिसली.
सूनगावकरांचा उस्फूर्त प्रतिसाद बघता भविष्यात सामाजिक वनीकरण व वन विभाग च्या माध्यमातून भविष्यात सुनगावास जास्तीत, जास्त रोपलागवड प्रस्तावित करण्यात येइल असा शब्द अधिकारी वर्ग ने दिला.