राहेरी खुर्द ते हिवरखेड रस्ता दुरुस्त करून द्यावा…!.
संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज
सिंदखेडराजा(प्रतिनिधी,सचिन मांटे)
सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावराजा ते देऊळगावमही या रस्त्याला लागून दोन गावांना जोडणारा राहेरी खुर्द ते हिवरखेडपूर्णा रस्ता दुरुस्त करून देण्याबाबत संबधित विभागाकडे नागरिकांनी केली मागणी केली आहे, रस्त्यावरून वाहतूक करताना व दुचाकी स्वारांना रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता याचा अनुमान लावणे कठीण होत आहे यातूनच पावसाचे दिवस असून काही शाळेतील मुलांना शाळेत जाण्यासाठी व तसेच गावातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी किनगावराजा असो कि देऊळगावमही वा इतर ठिकाणी जावे लागते, यातूनच राहेरी खुर्द व हिवरखेड पूर्णा या गावचा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे,सध्या रस्त्यांची अवस्था मोठाले खड्डे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे दुचाकीस्वारांना रस्त्याचा अनुमान लावता येणे कठीण होत आहे यातूनच दररोज किरकोळ अपघात होतातच पण काही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी संबंधित विभागाने नागरीकाचा होणारा त्रास कमी करावा व हा रस्ता संबधित विभागाने दुरुस्त करून द्यावा अशी राहेरी खुर्द येथील नागरिकांनी मागणी केली जातं आहे.


Mante