शहीद जवान स्व कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनगांव येथे मोफत महा आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर व अभिनेते प्रमोद अंबडकार यांचा नागरी सत्कार संपन्न
शहीद जवान स्व कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुनगांव येथे मोफत महा आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर व अभिनेते प्रमोद अंबडकार यांचा नागरी सत्कार संपन्न
गरजूंची सेवा हिच खरी सेवा असल्याची रुपलाल महाराजांची शिकवण – समाधान दामधर
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सुनगांव येथे दि. २४ मे रोजी शहीद जवान स्व. कैलास कापरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच महाराणा प्रताप जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती च्या निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग चे जिल्हा कार्याध्यक्ष श्री समाधान दामधर, जेष्ठ समाजसेवक शेषराव वंडाळे, प्रविण फार्मर ग्रुप व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जळगाव व रेड प्लस ब्लड बँक मार्फत मोफत महा आरोग्य शिबीर, रक्तदान व सुनगांव येथील अभिनेते, गीतकार, कवी श्री प्रमोद अंबडकार यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सदर शिबिरात हृदयरोग, जनरल मेडिसिन, हाडांचे विकार,नाक कान घसा विभाग, नेत्रविकार विभाग, सर्जरी विभाग, 2D इको व ECG व स्त्रीरोग विभाग अश्या एकूण ७ विभागाचे 700 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व औषोधपचार 20 डॉक्टरांद्वारे करण्यात आला. रुग्णांना पुढील तपासणी व ऑपरेशन करिता जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे रेफर करण्यात आले. श्री गणेश वसुले यांच्या रस्क्तदानाने शिबिराचा प्रारंभ झाला. बी एस एफ जवान अक्षय धुळे यांनी सुद्धा रक्तदान केले. यावेळी शहीद जवान स्व. कैलास कापरे यांच्या पत्नी मनिषाताईचा सत्कार करण्यात आला.
सदर शिबिरात भा रा काँ चे तालुकाध्यक्ष श्री अविनाश उमरकर व शेषराव वंडाळे यांचा केक कापुन वाढ दिवस साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमात बोलतांना श्री प्रमोद अंबडकार यांनी ” कुणाचेही कौतुक करणे खुप अवघड असून टीका करणे सोपे आहे, या सत्करामुळे ऊर्जा मिळेल ” अशी भावना व्यक्त केली. सदर शिबीरात बोलतांना ” रुग्ण सेवा हिच खरी सेवा असल्याची रुपलाल महाराजांची शिकवण” असल्याचे मत आयोजक समाधान दामधर यांनी व्यक्त केले. “अश्या प्रकारचे शिबिरं ही काळाची गरज असून गरजूंना लाभ देण्यातच खरं समाधान असल्याचे” मत जळगांव जामोद मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केले.
“गरजु व सर्वसामान्यांची सेवा हीच काँग्रेस ची परंपरा” असल्याचे मत अविनाश उमरकर यांनी व्यक्त केले.
गोर-गरिबां करीता आरोग्यसेवा करून स्मृती दिन साजरा करणे अतिशय स्तुत्य असल्याचे मत प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वातीताई वाकेकर, अविनाश उमरकर, प्रकाश पाटील, राजेश पाटील,डॉ. दलाल, अर्जुन घोलप, राजेश शित्रे, श्रीकृष्ण केदार, नारायणराव दामधर, शेषराव वंडाळे राजुभाऊ राजपूत, अक्षय घोलप, डॉ शालिग्राम कपले, डॉ प्रल्हाद कपले, ग्रामसेवक श्री खोद्रे साहेब, डॉ. राणे, महादेव गवई, दिनेश ढगे, विजय हिस्सल, वसंत धुर्डे, रामकृष्ण धुळे, सुनील भगत, रामशिंग राजपूत, निखिल वंडाळे, गोपाल धुळे, प्रकाश धुळे, मारोती कोथळकर, श्रीराम मिसाळ, गणेश वसुले, सुभाष ढगे,निलेश वंडाळे, रवी नानगदे, बाळू ठोसर, गणेश भड, महादेव भगत, राहुल इंगळे, निलेश भगत, रामेश्वर केदार,सागर भोपळे, अनिल अंबडकार, संजय इंगळे सर, शिवा वाणखडे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल येउल, श्रावण धुर्डे, पुंडलिक पाटील, गजानन खिरोडकर, गजानन सोनटक्के, विजय राऊत, रुपेश अंबडकार,दिपक उमाळे, विकास धुळे, विजय वंडाळे, ज्ञानेश्वर अंबडकार,गणेश राऊत, अमोल भगत, तसेच प्रवीण फार्मर ग्रुप चे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते. संचालन सुनील भगत यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल धुळे यांनी केले.