ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….
गजानन सोनटक्के
जळगाव जा
.:- मौजे वडशिंगी येथील गोपाल वानखडे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतःचे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ आत्महत्या केली होती.
या आत्महत्येला ९ महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा या कुटुंबाला तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक वेळेस उडवाउठवचे उत्तरे देवून वेळकाढू धोरण मारून देण्यात आले होते. त्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींनी किती दिवस शासकीय मदतीपासून वंचित रहावे हा सुद्धा प्रश्न असल्यामुळे आज दिनांक २४ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भुमीत्रांच्या वतीन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला होता.
त्यामुळे आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला २ तास उलटून सुद्धा संबंधित महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला फिरवून न पाहिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता.
त्यानंतर आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने दखल घेत नायब तहसीलदार गायकवाड यांनी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मृत गोपाल वानखडे यांच्या पत्नील व मुलगा प्रज्वल वानखडे यांना १ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात दिला.
यावेळी तुकाराम पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, अशपाक देशमुख, शुभम रोठे, सोपान पाटील, गणेशसिंग परिहार, विजय पाटील, अवी पाटील तसेच बहुसंख्य आंदोलनकर्ते तहसील परिसरामध्ये जमले होते.