Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यातील स्वस्त धान्याची वाटप तांत्रिक अडचणींमुळे ठप्प

Nivedan

जिल्ह्यातील स्वस्त धान्याची वाटप तांत्रिक अडचणींमुळे ठप्प

अडचणी सोडवण्या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसिलदारांना दिले निवेदन

चिखली:
स्वस्त धान्य दुकानामार्फत करण्यात येणारे धान्य वाटप हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे वाटप करण्यात येत असल्याने कमालीची परदर्शकता आलेली आहे. जिल्ह्यातील 1550 स्वस्त धान्य दुकानांमधून ऑनलाईन प्रक्रिये अंतर्गत ई पॉज मशिन धान्याची नियमित वाटप करण्यात येते. परंतु मागील महिण्यापासून इ पॉज मशिनच्या सॉफ्टवेअर मध्ये एन आय सी दिल्ली नविन अपडेशन इंस्टॉल करण्यात आल्या पासून ऑनलाईन धान्य वाटपाचा पार बो-या वाजल्याचे दिसून येत आहे.

ऑगष्ट 2022 मध्ये ई पॉज मशिन मध्ये आलेल्या अपडेशन नंतर सदर मशिन सुरळीत चालत नसल्याचे निदर्शनात आहे. एक एक कार्डाचे ट्रांजेक्शन व्हायला 15 ते 20 मिनिटे लागतात. शिवाय सर्व्हर मध्ये अडचणी असल्या कारणाने केलेला माल वेळेत सबमीट होत नाही. सबमीट झाला तर धान्याची वजावट अचुक होत नाही. या सरख्या अनंत अडचणी ई. मशिन च्या संदर्भात येत आहेत. दुकानदार सकाळीच दुकान उघडून बसतात. कार्ड धारक ही धान्य घेण्यासाठी येऊन बसतात बराच वेळ थांबून ही मशीन वर सुरळीत वाटप करता येत नसल्याने तांत्रिक अडचणींमुळे दुकानदार धान्य वितरीत करण असमर्थ ठरत आहेत. तर वेळेत धान्य मिळत नसल्याने कार्ड धारक आणि दुकानदार यांच्या मध्ये नाहक वादही काही ठिकाणी आहेत. यासर्करच्या भानगडीत लाभार्थी धान्यावाचून आणि दुकानदार ट्रांजेक्शन वाचून नाहकच भरडल्या जात आहे.

शिवाय माहे जुलै 2022 पासून APL शेतकरी लाभ योजनेचे गव्हाचे नियतन सरकार ने थांबविले असल्याने गोर‍ कार्डधारक गव्हापासून वंचीत राहत आहेत. शेतकरी लाभ योजणेतील कार्ड धारकांचे गव्हाचे नियतन बंद होऊन त्यांना केवळ माणसी 1 किलो तांदुळच मिळत असल्याने त्यांची नाराजी ही दुकानदारांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे सदर ग नियतन पुन्हा चालू करून गोरगरीबांना गव्हापासून वंचित ठेवु नये आणि तसेच मागील जुलै, ऑगष्ट चे गव्हाचे बंद झालेले नि ही मंजुर करुन ओल्या दुष्काळाने पोळलेल्या जनतेला सरकारने सहानुभुती पुर्वक मदत कारावी आणि इ पॉज संदर्भातील येण् अडचणी तातडीने सोडवाव्यात असे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने चिखली चे तहसिलदार यांच्या म जिल्हाधिका-यांना देण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष राजीव जावळे यांनी सांगितले की, एक दुकानदारांना धान्य वेळेत पोच होत नाही, धान्य मिळालेच तर मशिन चालत नाही अशा परिस्थितीत वाटप कशी करावी हा प्रश्न दुकानदारांसमोर उभा असतो. शिवाय वेळेत धान्य मिळत नसल्याने कार्ड धारकाचा रोष ही दुकानदारांनाच सहन क लागतो. तुटपुंज्या कमिशन वर काम करण-या स्वस्त धान्य दुकानदारांनी हासर्व त्रास का आणि कशासाठी सहन करावा ? श स्थरावर वेळोवेळी सुचना देऊन निवेदने देऊन ही ई पॉज मशिन संदर्भातील अडचणींची कुणीच दखल घेत नाही. या अड वेळेत सुटल्या नाहीत तर ई पॉज मशिन संदर्भात महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना पुन्हा एकदा राज्य व्यापी आंद उभे करून या कुचकामी ई पॉज मशिनची होळी केल्या शिवाय रहणार नाही. बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघ सचिव मोहनसेठ जाधव यांनी याप्रसंगी जिल्हाधिकारी साहेबांनी एन आय सी दिल्लीच्या अधिका-यांसोबत संघटनेची संयुक्त लावावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सदर निवेदन देतांना विकास पांडे, आर बी धुबे, एस बी घुबे, पांडु पांडे, श्री. मवाळ, F पाटील, दत्तात्रेय पाटील, भुजबळ, ऊतपुरे, के पी राजपुत, शे. सत्तार शे. मन्नु, कोल्हे, इत्यादी स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.