बुलढाणा ब्रेकिंग
शिवसेनेच्या कार्यक्रमात शिंदे गट व शिवसैनिक आपसात भिडलेबुलढाण्यात दोन्ही गटांचा राडा*
नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत यांना धक्काबुक्की, मेहेत्रे- संजय हाडे यांना मारहण
गजानन सोनटक्के जळगाव जा
बुलडाणा, 3 सप्टेंबर- शिवसेना आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत् सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की, हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते. यासंदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, ज्यात कुणाल गायकवाड स्पष्ट दिसत आहेत. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला. पोलीस बघ्याची भूमिका घेऊन होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. संजय हाडे यांच्या पोटात लाथ घालण्यात आली. छगन मेहेत्रे यांनाही मारहाण झाली. घटने नंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. हल्ला करून शिंदे गटातील सैनिक निघून गेले. दरम्यान पोलीस काय करत होते ? हा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात शिंदे गटाचे काय म्हणणे आहे, हे वृत्त लिहीपर्यंत समजले नाही समजलेलं नाही