गजानन सोनटक्के जळगाव जा
सूनगाव जळगाव रोडवर चारचाकी क्रमांक mh 05 DH5448 ची झाडाला धडक लागून मूळचे सूनगाव रहिवासी किसन नथुजी नानकदे हे मृत्युमुखी पडल्याची घटना दिनांक 11 एप्रिल रात्री आठच्या सुमारास घडली आहे सुनगाव येथील मूळ रहिवासी असणारे स्वर्गीय किसन नथुजी नानकदे हे जळगाव येथे राहत होते जळगाव वरून सूनगावला आपल्या स्वतःच्या चारचाकी गाडीने येताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकीची झाडाला धडक बसली यामध्ये ते गंभीर स्वरूपात जखमी झाले त्यामुळे पुढील उपचारार्थ त्यांना ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेण्यात आले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले दिनांक 12 एप्रिलला त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला ते ongc येथे सेवेवर रुजू होते त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे