Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सातपूड़यातील वन्य प्राणी तहानेने व्याकुळ व सैरावैरा !

Gajanan sonttake

पाण्याच्या शोधात बाल गोविंद महाराज मंदिर च्या परिसरात घुसले अस्वल

वनविभागाने पाणवठे न भरल्याने जनावरांचे हाल.

गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद दि 10
तालुक्यातील सुनगाव येथून 3 ते 4 किलोमीटर सातपुडा पर्वतात आज सकाळी पाण्याच्या शोधार्थ एक अस्वल बाल गोविंद महाराज मंदिरात शिरल्याने येथे रामनवमी निमित्त उपस्थित भक्तांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे जंगलात कुठेही पाणी नसल्याने तहानेने व्याकुळ हे अस्वल वनात असलेल्या मंदिराच्या नैसर्गिक पाणवठ्यावर आपली तहान भागवायला आले सविस्तर वृत्त असे की तालुक्यात सातपुडा पर्वत रांगेचा उंबर देव ते कुवर देव हा वन विविधतेने संपन्न असा जंगल चा भाग आहे यामध्ये शेजारील अंबा बरवा यावल व मुक्ताईनगर या वनांमधील वन्य प्राण्यांचा जोड रस्ता म्हणून कायम वर्दळ असते त्यामुळे मागील काही वर्षात या भागातील वन्यप्राणी ची संख्या वाढली आहे सध्या उन्हाचा पारा वाढत असून तापमान त्याच्या परमोच्च बिंदूवर पोहोचत आहे वनात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे कुठेही दूरदूर वर पाणी नाही त्यातच वनांच्या जवळ असलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी बोर व विहिरी केल्याने नैसर्गिक पानवठे सुद्धा सुकलेल्या आहेत अशा कठीण परिस्थितीत वन्य प्राणी पाण्यासाठी वणवण फिरून मरण्याच्या परिस्थितीत आहेत तरी यासाठी जबाबदार असलेला वन विभाग मात्र उदासीन धोरण स्वीकारून आपली जबाबदारी काढताना दिसत आहे वनविभागाने कागदोपत्री काही कृत्रिम सिमेंट पाणवठे दाखवल्याचे कळत असून ते नियमितपणे टॅंकरने भरत असल्याचा देखावा व रेकॉर्ड मेंटेन करत असल्याचे विश्वसनीय माहिती आहे परंतु प्रत्यक्षात काही वन प्रेमींनी वनात फीरून पाहिले असता एकही पाणवठा भरल्याचे कोणतीही खून दिसून आली नाही आदिवासींना व गुराख्यांना विचारले असता असे कुठलेही ट्रॅक्टर किंवा टँकर पाणी भरण्यासाठी येत नसल्याचे कळले त्यामुळे वनविभाग या वन्य प्राण्यांचे सह तालुक्यातील जनतेची व शासनाची सुद्धा दिशाभूल करत असल्याचे दिसून येते तरी वन विभागाने तात्काळ व नियमित सर्व पाणवठे स्वच्छ पाण्याने भरावे व पानवठे यांची संख्या वाढवावी ही मागणी निसर्गप्रेमींनी मध्ये जोर धरत आहे या विषयीचे लेखी निवेदनही लवकरच वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे आज रामनवमी निमित्त जमलेल्या भाविकांना जर या अस्वलाने हल्ला केला असता तर अस्वल व भाविक दोघं दोघांनाही धोका होता वयाच्या सर्वस्वी जबाबदार वनविभाग ठरत आहे तालुक्यातील वनांची स्थिती अतिशय बिकट असून परिसरात सर्वच वनगुन्हे सर्रास सुरू आहेत वन विभागाची वने सांभाळण्याची कुठलीच मानसिकता दिसत नसून मागच्या वर्षी तालुक्यात एवढे मोठे वनक्षेत्र असल्यावर एकही रोपटे लावण्यात आले नाही ही आश्चर्याची बाब आहे तसेच पुरेशी जलसंधारणाची कामेही सातपुड्यात होणे गरजेचे आहेत याविषयी एक वेळ बुलढाणा जिल्ह्याचे वन अधिकारी आयएफएस अक्षय गजभिये हे जळगाव जामोद ला येऊन त्यांनी मानद वन्यजीव रक्षक मंजितसिंग शिख यांच्या उपस्थितीत निसर्गप्रेमींची मीटिंग घेतली होती व आश्वासन दिले होते के मी जॉईन झाल्यापासून यापुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी वने व वन्य प्राणी यांची प्रामाणिक पणे काळजी घेईल परंतु मागील एक वर्षाचा कालावधी व त्यांच्या व त्यांच्या चमूचा कामाचा आलेख व पद्धत पाहिली असता ती मीटिंग म्हणजे बोलाचाच भात व बोलाचीच कढी असल्याचे निदर्शनास येते एकंदरीत या वन्यप्राण्यांना सध्या दैवच वाली असल्याचे दिसून येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.