
सुनगाव ग्रामपंचायत वार्ड नंबर 3 मध्ये घाणीचे साम्राज्य
नाल्या भरल्या तुडुंब
गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुनगाव येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये घाणीचे साम्राज्य असलेले चित्र आहे या वार्ड क्रमांक 3 मध्ये आठवडी बाजार हा शनिवारी भरल्या जातो त्यामुळे दुसऱ्या दिवशी या परिसरात बराचसा केर कचरा जमा होतो परंतु ग्रामपंचायत दोन ते तीन लाख रुपये बाजार हराशी करून सुद्धा या बाजार परिसरातील केरकचरा हा दुसऱ्या दिवशी गोळा केल्या जात नाहीत तसेच प्लास्टिक पिशव्या बाजारामुळे या परिसरात पडलेल्या दिसत आहेत त्या खाऊन कित्येक गुरेढोरे मृत्युमुखी पडले आहेत जिकडे तिकडे घानच घाण पसरलेली दिसत आहे या बाजार परिसरात नाल्यांचे बांधकाम केलेले नाही व सांडपाण्याची विल्हेवाट लावलेली नाही त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशा अनेक समस्या या वार्ड नंबर 3 मध्ये भेडसावत आहेत या परिसरातील नाल्या सफाई कामगार काढत नाही असा येथील नागरिकांचा आरोप आहे या परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहे कित्येक कचरा हा पंधरा ते वीस दिवसांपासून पडून आहे परंतु ग्रामपंचायत कडे सफाई कामगार व घंटागाडी असतानासुद्धा हा कचरा उचलल्या जात नाही ही मोठी शोकांतिका आहे व परिस्थिती पाहता काही नागरिकांनी तर स्वतः नाल्या साफ केलेल्या आहेत व स्वतः खाजगी मजूर सांगून नाल्या काढलेल्या आहेत या परिसरात वार्ड क्रमांक 3 मध्ये सत्तेत असलेले एक सदस्य व खुद्द उपसरपंच यांचा वार्ड आहे तरी हा परिसर हा विकासापासून वंचित का आहे याचे उत्तर विरोधी ग्रामपंचायत सदस्य सौ दीपिका रामसिंग राजपूत यांचे पती यांनी सरपंच हे आम्हीविरोधी सदस्य असल्यामुळे माझे काहीच ऐकून घेत नाही व मी त्यांना फोनवर संपर्क साधला असताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असा आरोप त्यांनी केला आहे तरी या परिसरातील नाल्यांचे बांधकाम व कचऱ्याचे ढीग व परिसरातील कचरा हा वेळोवेळी साफ करून नाल्या साफ कराव्यात या परिसरात 15 ते 20 दिवसंपासून सफाई कामगार यांनी परिसरातील नाल्या काढलेल्या नाहीत या परिसरातील नागरिकांनी येथील साफसफाईचे मागणी केली व व ग्रामपंचायत बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे