मौजे शेळगाव आटोळ येथे मा. ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रेशन कार्ड वितरण शिबिर संपन्न
पालकमंत्री मा. ना. डॉ. राजेन्द्रजी शिंगणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे शेळगाव अटोळ येथे दिनांक 2/4/22 रोज शनिवारी रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात नाविन रेशन कार्ड काढणे , दुय्यम रेशन कार्ड काढणे, रेशन कार्ड मधून नाव वेगळे करुण नवीन कार्ड देणे , रेशन कार्ड मधून नाव कमी करणे , रेशन कार्ड मध्ये नवीन नाव समाविष्ट करणे इत्यादी सेवा देण्यात आल्या, परिसरातील शेळगाव आटोळ, मंगरुळ , इसरूळ , मिसाळवाडी , आमोणा , अंचरवाडी , कोनड, देऊळगाव घुबे, इत्यादी गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून रेशन कार्ड संदर्भातील प्रलंबीत असलेली आपली काम पूर्ण करून घेत शिबिराबाबत समाधान व्यक्त केले . याप्रसंगी पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी श्री सुनील झाल्टे , ए के फुड शेखर सुरडकर साहेब , रेशनकार्ड लिपिक शेटे साहेब, सचीन भुतेकर, ऑपरेटर भागवत मंडळकर, सचिन दिवटे , तलाठी भूतेकर साहेब , सचिव रिंढे साहेब , सोळंकी साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष तथा रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव जावळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. तालुका उपाध्यक्ष तथा मेरा खु सर्कल चे राष्ट्रवादी नेते डॉ. विकास मिसाळ , सुरेश पाटील भूतेकर , रा. यु. कॉ. तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ , मंगरूळ मा. सरपंच देवानंद गवते , मिसाळवाडी सरपंच बाळू पाटील मिसाळ , शेळगाव आटोळ सरपंच सुरेश राजे , उपसरपंच संतोष बोर्डे , मा. उपसरपंच पांडुरंग देशमुख, राष्ट्रवादी युवा नेते सतिश भूतेकर , चिखली कृउबास प्रशासक गजानन परीहार , अमोना ग्रा.प. सदस्य डॉ. शिवदास भांदर्गे, कोनड उपसरपंच गजानन जावळे, तसेच एकनाथराव परिहार, पांडुरंग पांडे, अनिल अरबुने, राहूल मिसाळ, बबन इंगळे , विनोद बांबल, मारोती शिवरकर आदी रेशन दुकानदार उपस्थित होते, या शिबिराच्या यशस्वितेसाठी तहसीलदार डॉ अजितकुमार येळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले तर यशस्वीतेसाठी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेळगाव अटोळ येथील ग्रामपंचात सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.