गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 13 एप्रिल रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील खवले, उपाध्यक्ष विनोद अंबडकार, गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे, शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर,समाधान भगत,सौ मुर्हेकर ताई, पत्रकार गजानन सोनटक्के अनिल भगत यांची मंचकावर उपस्थिती होती. सर्वप्रथम गावामधून प्रभात फेरी काढण्यात आली व नंतर पालक मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळा पूर्वतयारी विषयी सखोल माहिती शाळेचे शिक्षक संदीप सारोकार यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन सहावे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख सर यांनी मानले. यावेळी पहिलीतील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कसे शिक्षण द्यावे याविषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक निकम सर, खेरोडकर सर,उमाळे मॅडम, बोंबटकार मॅडम, क्षिरसागर मॅडम, राजगुरे मॅडम, साबे मॅडम, खर्डे मॅडम, गवई मॅडम, यासह सर्व अंगणवाडीच्या शिक्षिका व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करिता मनोहर वानखडे व राजू अंदुरकार यांनी परिश्रम घेतले.