
अखेर संगणक टंकलेखन घोषित
शेगांव- महाराष्ट्र परीक्षा परिषद, पुणे तर्फे नोव्हेंबर 21 मधे झालेल्या परीक्षेचा निकाल TET मगाघोटाला
मूळे लागत नव्हता. या परीक्षेत राज्यातील 4000 संस्थांमघून सव्वालाख विद्यार्थी बसले होते, प.प. वरील परीक्षेचा निकाल वरिष्ठ अधिकारी TET मगाघोटाला मधे अटकेत असल्यामुळे दुर्लक्ष होत होते, राज्य संघटनेने शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक आमदार याची भेटी घेऊन संगणक टंकलेखन परीक्षेच्या निकाल न लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी करिता अर्ज करता येत नाही, तसेच राज्यातील 4000 संस्था चालकाचा उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झालेला आहे, हे पटवून दिले, तेव्हा मा. शिक्षण मंत्री सौ गायकवाड यांनी संगणक टंकलेखना चा निकाल घोषित करण्याचे आदेश दिले व पुढील परीक्षेचे नियोजन त्वरित करावे अशी सूचना दिली, कमी राज्य संघटना चे अध्यक्ष प्रकास कराळे, महासचिव हेमंत ढमढेरे तसेच सर्व पदाधिकारी यांनी सतत प्रयत्न केले,डिसेंबर 21 पासून सुरू झालेल्या सत्राची परीक्षा ही एप्रिल 22 मधे होणे आवश्यक आहे, परंतु मा. मंत्री महोदयांनी आदेश दिल्या नंतरही परीक्षा परीक्षे कडून अद्यापही जाहीर झाला नाही ती त्वरित जाहीर करावे अशी मागणी प.प. कडे राज्य संघटनेचे सहसचिव अरुण चांडक यांनी केली