स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभात फेरी व सामूहिक राष्ट्रगान.
व भव्य तिरंगा महारॅलीचे आयोजन
गजानन सोनटक्के
जळगाव जा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाचा दिनांक 8 ऑगस्ट पासून 17 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिन या दीनी सुनगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा तसेच मातोश्री नथियाबाई विद्यालय यांनी संयुक्तरीत्या गावामधून प्रभात फेरी काढली. तसेच आपापल्या कार्यालय मध्ये थोर स्वातंत्रता सेनानी वीर बिरसा मुंडा व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर मातोश्री नथियाबाई विद्यालय येथे सेवानिवृत्त सुभेदार आर डी वाघमारे यांचा मातोश्री नथियाबाई विद्यालयात विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच रामेश्वर अंबडकार व सचिव खोद्रे यांनी सुद्धा सेवानिवृत्त सुभेदार आर डी वाघमारे यांचा सत्कार केला.यावेळी अध्यक्षस्थानी मातोश्री नथियाबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, सचिव खोद्रे साहेब, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील खवले, पत्रकारांनी अनिल भगत,गजानन सोनटक्के यांची उपस्थिती होती.यावेळी सेवानिवृत्त सुभेदार आर डी वाघमारे यांनी आपल्या जीवनातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन करून सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच सकाळी 11 वाजे दरम्यान मातोश्री नथियाबाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सामुहिक राष्ट्रगीत म्हणायला विद्यालयाचे विद्यार्थी व जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक ताडे सर,सारोकार सर,अस्मिता क्षिरसागर, बुटे सर व सर्व शिक्षक वृंद तसेच गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, सचिव खोद्रे,तलाठी वाघ, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय इंगळे,शिक्षक शिवदास सोळंके,अढाव सर,फोलाने सर व सर्व शिक्षक वृद,पत्रकार गजानन सोनटक्के, अनिल भगत, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक दोन्ही शाळेचे कर्मचारी यांनी सामुहिकरित्या राष्ट्रगीताचे गायन केले.. व बजरंग दलाकडून भव्य तिरंगा महारॅली चे आयोजन करण्यात आले यावेळी रॅलीत बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे विभाग संयोजक नंदू दलाल जिल्हा विद्यार्थी संयोजक ऋषी येउल गावकरी उपस्थित होते