ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी 25,000 रुपये मदत जाहिर करा – डॉ. विकास मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट एकरी 25,000 रुपये मदत जाहिर करा – डॉ. विकास मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चिखली तालुक्यातील शेळगाव अटोळ आणि मेरा खू. महसूल मंडळ कार्यक्षेत्रात दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसाने तसेच यानंतरही सुरू असलेल्या सततच्या संतत धार पाऊसाने शेतातील पिकांचे ७० ते ८०% नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे . या अस्मानी संकटात सापडलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट 25,000 रूपये आर्थिक मदत देण्यात यावी तसेच दोन्ही महसुल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मा. तहसिलदार चिखली यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर डॉ. विकास मिसाळ, राजीव जावळे,सुरेश भुतेकर , सतीश भुतेकर, भिकणराव भुतेकर, शेनफड पाटील, ज्ञानेश्र्वर वरपे, सुरेश राजे, संतोष बोर्डे, कृष्णा मिसाळ, पांडुरंग देशमुख, कैलास बोर्डे, शरद गावडे, उद्धव घुबे , शिवदास भांदर्गे, भागवत थुट्टे, भास्कर जावळे, तुळशीदास जावळे,देवानंद गवते, अमोल थुट्टे, विशाल थुट्टे, परमेश्वर वानखेडे, दादाराव सुरडकर, गजानन जावळे, सिद्धार्थ वानखेडे, अरुण वराडे, प्रभाकर काळे, रामदास झाल्टे, भागवत घुबे, राम सांगळे,श्रीधर जगदाळे, भागवत माने, गणेश निकम, दत्तात्रय इंगळे, ज्ञानेश्र्वर शिंदे, लक्ष्मण पेहरे, पुंजाराम पेहरे, ज्ञानेश्र्वर साप्ते