Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेतकरी कुटुंबातील सरपंच महिलेने शेतकऱ्यांच्या काळजी पोटी लिहिले पंतप्रधानांना पत्र

sau gangubai damdhar sarpanch

शेतकरी कुटुंबातील सरपंच महिलेने शेतकऱ्यांच्या काळजी पोटी लिहिले पंतप्रधानांना पत्र -सौ. गंगुबाई पुंडलिकराव दामधर रा.जामोद ता. जळगाव जामोद जि बुलढाणा महाराष्ट्र येथील लोकनियुक्त सरपंच आहे त्यांनी खत दरवाड झाल्याचे वृत्त ऐकल्यापासून त्या व्यथित होत्या व त्या एक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीपोटी त्यांनी खताच्या किंमती कमी करण्यासाठी लिहिले थेट पंतप्रधानांना पत्र .

पत्र लिहून लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांना मातीमोल शेतीमाल ,फळ ,भाजीपाला विकण्यापासून ते खताच्या दरवाढीमुळे होणारे नुकसान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे . पंतप्रधानांनी या प्रकरणात स्वतः लक्ष देऊन खतांचे वाढलेले दर तात्काळ कमी करण्याची विनंती करण्यात आली आहे . एक शेतकरी कुटुंबातील महिला सरपंचाची यातुन शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ दिसून येते व सर्वत्र याचीच चर्चा आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.