Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शासनाने खते बियाने च्या किंमती कमी करून शेतकऱयांना दिलासा दयावा : गोपाल तायडे

शेतकऱ्यांची करिप हंगामाची तयारी करीत अस्थाना यंदा कधी नव्हे ते बियाणे व खताचे भाव वाढ झाली असून रसायनिक खाताचे जवळपास दिड पटीने भाव वाढले आहेत आता पर्यंत किरकोळ ५०/१००रु ची भाववाढ व्हायची. अदा मात्र तब्बल डीळ पटीने रसायनिक खाताचे भाव वाढ झाली आहे.बाजारात आता जे खत येत आहे,ते नविन भावाचे खत येत आहे.व ते भाव दिड पटीने वाढलेले आहेत. डी.ए.पी पुर्वी १२००.रु ला मिळावयाचे ते आता १९००.रु नुसार मिळेल.जे १२-३२-१६. हे खत ११७५.मिळावयाचे ते आता १८००.रु ला मिळेल.
ऐवढे भाव वाढल्यावर शेतकऱ्याची शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांन पढला आहे.
यावर्षी जुने खात नविन भावाने विकुन शेतकऱ्यांची फसवणूक होने ही शक्यता नाकारता येत नाही.जुने खत बिलाची पावती न देता, नविन दराने विक्री करतील याकरीता शेतकऱ्यांनी खताचे पक्के बिल घेतलेच पाहिजे. कोरोना महामारीत ही शेतकरी शेतात राब राब राबून अहोरात्र अन्न पिकऊन अश्या संकटाच्या वेळीही आपले योगदान देशाला देत आहे. असे असतांना देखील शेतकऱ्यांच्या पदरात येते तर ती फक्त निराशाच शासनाने बियाणे रसायनिक खाताचे भाव वाढ त्वरित थंबवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.