Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना,अपघाती मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपयांची मदत

शेतकऱ्यांना अपघातातील जोखमीसाठी विम्याचे संरक्षण,शेतकऱ्यांना अपघातातील जोखमीसाठी विम्याचे संरक्षण

COVIDE – 19

बुलडाणा, दि.28 : राज्य शासनाने शेतकऱ्यांना शेती काम करताना अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून विम्याचे कवच प्रदान केले आहे. अशा अपघातांमध्ये जोखमीसाठी विम्याचे संरक्षण यामुळे शेतकरी कुटूंबांना मिळत आहे.  या योजनेनुसार शेती करताना अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा धक्‍का बसणे, रेल्वे व रस्त्यावरील अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, दंगलीत होणाऱ्या अपघाती घटनांमुळे होणारे मृत्यू तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो. अथवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटूंबास आर्थिक लाभ देणे आवश्यक असते.

   या योजनेमध्ये 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचा अपघात होवून मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास 2 लक्ष रूपये, अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 2 लक्ष रूपये रक्कम देय आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास त्यासाठी शेतकऱ्यांना कुठलाही विमा उतरविण्याची आवश्यकता नाही. योजनेचा लाभ मिळविण्याकरता मृतक किंवा अपंग व्यक्ती 7/12, 6क, 6 ड (फेरफार) यामध्ये नोंदणीकृत असलेले आणि वय 10 ते 75 वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र आहेत.  

    शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास योजने तंर्गत लाभ घेण्यासाठी https://www.auxilliuminsurance.com /insurance_company.html या लिंकवर पुर्वसुचना देण्यात यावी. तसेच संबंधित तालुका कृषि अधिकारी अथवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा व दावा अर्ज कागदपत्रांसह दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे. तसेच योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.  योजनेसाठी विमा सल्लागार म्हणून मे. ऑक्झिलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि, प्लॉट नंबर 61/4, सेक्टर – 28, प्लाझा हटच्या पाठीमागे, वाशी, मुंबई – 400703, दुरध्वनी क्रमांक 022-27650096, टोल फ्री क्रमांक 1800 220 812, ई मेल gmsavy21@auxilliuminsurance.com आहे. विमा कंपनी म्हणून युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. युनिट नंबर 601-602, 6 वा मजला, रिलायबल टेक पार्क, क्लाऊड सिटी कॅम्पस, ठाणे-बेलापूर रोड, एरोली, नवी मुंबई-400708, दुरध्वनी क्रमांक 022-41690888, टोल फ्री क्रमांक 1800224030 / 1800 2004030, ई मेल vaibhav. shirsat@universalsompo.com व yogendra.mohite@universalsompo.com आहे.

लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभाकरीता खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध असलेला मुळ प्रतीतील अर्ज, दावा अर्ज,  सर्व मूळ प्रतीतील 7/12, 6 क व 6 ड (फेरफार),  नमुना 8-अ, वारसदाराचे बँक खाते पुस्तकाची छायांकित प्रत, अर्जदाराच्या फोटोसह घोषणापत्र अ आणि घोषणापत्र ब, वयाचा दाखल्यामध्ये मतदान कार्ड, पॅन, चालक परवाना, जन्माचा दाखला, पासपोर्ट, शाळेचा दाखल यापैकी एक साक्षांकित केलेली छायांकित प्रत, मूळ प्रतीतील मृत्यूचा दाखला, प्रथम माहिती अहवाल (एफआयआर), अकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेष्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा), पोस्टमार्टम रिपोर्ट (शव विच्छेदन अहवाल), वाहन चालविण्याचा वैध परवाना, व्हिसेरा रिपोर्ट.   

Leave A Reply

Your email address will not be published.