Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नागझरी फाट्यावर दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी तर 2 जण जखमी.

MEHKAR

मेहकर रवींद्र सुरूशे – मेहकर चिखली रोड वरील नागझरी बु.जवळ दुचाकीच्या अपघातात तीन जण जखमी. सविस्तर माहिती अशी की, मेहकर चिखली रोडवर नागझरी बु.येथे मेहकर कडून चिखली कडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक MH28 BF4073 या मोटर सायकल वर येणाऱ्या दुचाकीस्वाराने शेतातून घरी परतत असताना शेख हबिद वय 50 व शेख रफिक वय वर्षे 37 राहणार नागझरी तालुका मेहकर यांना धडक दिल्यामुळे दोघे पिता-पुत्र जखमी झाले असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.त्यांची ओळख वृत्त लिहीपर्यंत झालेली नव्हती. प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वार हे चिखली येथील आहे अशी प्राप्त सूत्रांकडून माहिती मिळाली. संबंधित जखमी व्यक्तीवर मेहकर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुढील तपास मेहकर पोलिस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.