Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये कुतूहल मेहकर जवळ आढळले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष .

बुलढाणा जिल्यातील मेहकर – जानेफळ रस्त्यावरील शहर नजिक एका शेतालगतच्या नाल्याचे खोदकाम सुरू असताना खोदकामात हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळले आहे . 27 मे रोजी सकाळी कामावरील मजूर अनिल महादेव इंगळे यांच्या शेतात खोदकाम करत असताना खोदकामात हेमाडपंथी मंदिराचे अवशेष हा प्रकार समोर आला . सध्या खोदकाम थांबवण्यात आले असून , पुढील खोदकाम पुरातत्व विभागाकडून केले जाणार आहे . या घटनेमुळे मेहकरचा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा उजळला आहे .मेहकर येथील अनिल महादेव इंगळे यांचे मेहकर जानेफळ रोडवर सर्वे नंबर 33 मध्ये शेती आहे . शेतीच्या बाजूने पैनगंगा नदी वाहते . नदी जवळच नाला आहे , या नाल्याचे खोलीकरण करून त्यातील माती शेतात टाकण्याचे काम मजुरांकडून करून घेतले जात होते .

Hemadpanthi mandir

सकाळी 20 फूट खोलवर अचानक हेमाडपंथी मंदिराचे काही अवशेष लागले . ओटा , नंदी , काही खांब , कोरीव पायऱ्या आढळताच शेतमालक इंगळे यांनी तहसीलदार संजय गरकल यांना माहिती दिली . तहसीलदारानीं घटनास्थळी येऊन पाहणी केली . त्यानंतर पुरातत्व विभागाला कळविण्यात आले . सध्या या स्थळी तलाठी व पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . पुढचे खोदकाम पुरातत्व विभागाकडून होणार आहे .पैनगंगेच्या तीरावर हे हेमाडपंथी मंदिर शेकडो वर्षांपूर्वी नदीच्या पाण्यामुळे जलमय झाले असावे , अशी शक्यता व्यक्त होत आहे . मंदिर आढळल्याची माहिती मिळताच नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली .

खोदकामात आणखी काय काय समोर येईल याबद्दल आता सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे . मेहकरशहरास ऐतिहासिक वारसा असून , मेहकर शहरात शेकडो वर्षे जुना कंचनीचा महाल आहे . ऐतिहासिक बालाजी मंदिर आहे . दगडी सभामंडप ,ओलांडेश्वर मंदिराच्या बाजूला राम राज्यातील ऐतिहासिक असे कुंड ,आहे . मेहकर शहराच्या मध्यभागी पाचपीर बाबाची दर्गा तर खालचे स्टॅन्ड येथे शेकडो वर्षे जुने दगडाचे सभागृह आहे . त्यात आणखी एका ऐतिहासिक वारशाची भर पडल्याने मेहकरच्या लौकिकात भरच पडली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.