Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पाणीपुरवठ्याची मोटर पाण्यामध्ये गेली वाहून ; हिवरखेडपूर्णा येथील घटना

आनंद राजे किनगावराजा दि.१५ (प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेडपूर्णा येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटारीसहा सर्व साहित्य प्रकल्पाचे पाणी सोडल्यामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे.यासंदर्भात येथील सरपंच सुनील गोरे व ग्रामसचिव एस.ए. शिंगणे यांनी सिंदखेडराजाचे तहसीलदार यांना माहिती देऊन मदत करण्याचे आवाहन निवेदनाद्वारे केले आहे.


पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,जिल्हाधिकारी बुलडाणा,कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा बुलडाणा तसेच गटविकास अधिकारी पं. स.सिंदखेडराजा यांना दिलेल्या सदर निवेदनाद्वारे मागील महिन्यात संपूर्ण राज्यात २९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे चोखासागर प्रकल्प पूर्णतः पाण्याने भरल्यामुळे त्यामधील पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने पाणी सोडण्यात आले.सोडलेल्या पाण्यामुळे हिवरखेडपूर्णा येथील नदीपात्रातील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील,पाईप,केबल,विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले.यामुळे गावाला पाणीपुरवठा करणे बंद झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजने अंतर्गत संबंधित साहित्य खरेदी करण्यास तात्काळ सहकार्य करावे अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच सुनील गोरे,ग्रामसचिव ए. एस.शिंगणे नंदकिशोर दत्तात्रय कुटे,श्रीधर दत्तात्रय कुटे,सुरेश वसंता वाघ,रमेश राघोजी भुसारी,कडूबा पर्वता कुटे,शाम विजय राजमाने,शरद काशिनाथ नागरे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया,सुनील गोरे सरपंच हिवरखेडपूर्णा :- खडकपूर्णा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरिवरील सर्व साहित्य वाहून गेले आहे.गावकऱ्यांसह सर्व साहित्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु साहित्य सापडले नसल्याने गावाला पाणीपुरवठा करणे अशक्य झाले असून संबंधित विभागाने सर्व साहित्य तात्काळ उपलब्ध करुन गावकऱ्यांची समस्या दूर करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.