Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मडाखेड येथील त्या बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला गावातीलच विहरीत..

गजानन सोनटक्के जळगांव जा. प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथील मंगेश गायगोल यांची बहीण वनिता हीचा विवाह खामगाव तालुक्यातील घाणेगाव येथील पुरुषोत्तम सीत्रे यांच्या सोबत झाला होता. तिचे माहेर हे मडाखेड होते.ती काही दिवस अगोदर आपल्या माहेरी मडाखेड येथे भावाकडे आली असता,ती दिनांक 15 जुलै रोजी दुपारी दोनच्या वाजेदरम्यान अचानक पणे घरी कोनालाही काही न सांगता घरुन निघून गेली. तिचा नातेवाईक व इतरांनी शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

JJ

अखेर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला वनीता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने दाखल केली होती.अखेर दिनांक २० जुलै रोजी मडाखेड बुद्रुक चे सरपंच विजय कड यांच्या वाड्यात सदर महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती काही गावकऱ्यांनी दिली असता, गावातील लोकांची मृतदेह पाहण्यासाठी एकच गर्दी जमली. या बाबतची माहिती ही ग्रामस्थांनी सरपंच व पोलीस पाटील यांना दिली.सदर वर्णन केलेल्या महिलेच्या माहितीच्या आधारे विहिरीत असलेला मृतदेह हा वनिता हीचा असल्याचे स्पष्ट झाले.वनीता ही घरून पाच दिवसापासून गायब होती.सदर वनीताचा मृतदेह विहिरीत असल्याबाबत ची माहिती जळगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली.

घटनास्थळी जळगांव पोलीस स्टेशचे वानखडे हे आपल्या सहकाऱ्यासोबत घटनास्थळी जाऊन त्यांनी प्राथमिक तपास करून पंचनामा केला व सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जळगांव जामोद ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला .जळगांव जामोद पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला. सदर मर्ग क्रमांक ५२/२०२१ कलम १७४ नुसार दाखल.पुढील तपास जळगांव जा.पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक अनिल सुशिर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.