Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सहकार ची 100% निकालाची परंपरा कायम. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न…

मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच 16 जुलै रोजी जाहीर करण्यात आला आहे यामध्ये स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले तर सलग सातव्या वर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा पालकांच्या सहकार्याने कायम ठेवली आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक 20 जुलै रोजी शाळेच्या प्रांगणात covid-19 च्या संबंधी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांच्या अधीन राहून मोठ्या थाटात साजरा झाला.

SAHAKAR

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला, प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वाती केला मुख्य संयोजिका, संचालक प्रमोद भंसाली शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे,प्रकाश भुते,पर्यवेक्षिका अर्चना कुलकर्णी हे उपस्थित होते. डॉक्टर किशोर केला अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश खरच कौतुकास्पद आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतले ते उल्लेखनीय आहे यावेळी डॉक्टर सौ स्वाती केला म्हणाल्या की विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षण हे नवीन असले तरी सर्वजण त्या कसोटीवर खरे उतरले. यावेळी साक्षी धुर्डे,अनमोल बडमेरा, अजिंक्य उमाळे,भूमी भंसाली, स्नेहा तायडे,क्रिपा केला,नचिकेत ताडे, इत्यादी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी गौरवोद्गार काढले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका मनीषा म्हसाळ, अरुणा व्यवहारे, विषय शिक्षक जगदीश राऊत, राजेश आठवले, हेमलता राजपूत यांनी मार्गदर्शन केले. परीक्षेसाठी शाळेमधून एकूण 29 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण तर उर्वरित विद्यार्थ्यांना 70 टक्के याच्यावर गुण मिळाले आहेत विद्यार्थ्यांपैकी कुमारी साक्षी सुरेश धुर्डे-98.60% गुण घेऊन प्रथम तर सानिका अरुण हिंगे-98.40% घेऊन घेऊन शाळेमधून द्वितीय तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक आणि अनुक्रमे कु.क्रिपा मनोज केला-97.20%,अजिंक्य विनायक उमाळे-96.40% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेश राठी धनंजय बावस्कार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार व चहा ने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.