Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सूनगावचा देवराई उपक्रमामुळे सातपुडा आणखी हिरवा होणार

तालुक्यातील सूनगाव येथील तरुण मित्रांनी एकत्र येत वनसैनिक बनून लोकसहभाग घेत श्रमदानातून 1001 वृक्षलागवड व संगोपनाचा जो वसा घेतला आहे ,त्यातून निश्चित सातपुडा हिरवा होण्यास मदत होईल असे मत जळगाव जामोद सामाजिक वनीकरण च्या रेंज फॉरेस्ट ऑफीसर सौ स्मिता राजहंस यांनी व्यक्त केले.
सूनगाव येथे आयोजित वृक्षलागवड महोत्सवात त्या बोलत होत्या.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव जामोद तालुक्यात सूनगाव येथे वनसैनिक म्हणून समोर येत काही नवंतरुण मित्रांनी ‘ देवराई -2021’ नावाने लोकसहभाग व श्रमदानातुन वृक्षलागवड व संगोपन उपक्रम हाती घेतला.

प्रथम टप्प्यात जून महिन्यात श्रमदानातून 1001 खड्डे खोदून तयार करण्यात आले, व द्वितीय टप्प्यात रोपलागवडीचे काम सुरू करण्यात आले आहे, याच दरम्यान नुकताच दि 16 जुलै ला स्थानिक गोरक्षनाथ महाराज मंदिरशेजारी ओसाड जमिनीवर 2018 व 2019 ला पाणी फाऊंडेशनतर्फे जलसंधारणाचे कामे झाली होती, त्याच जमिनीवर आता वृक्षरोपन चा उत्सव आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी 51 वृक्ष लावून व श्रमदान करून ह्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

सातपुड्याच्या पायथ्याशी तरुणांनी हे जो स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे त्यास निश्चित फळ येईल, जो घाम इथे हे तरुण गाळत आहेत , काही वर्षात त्या घामाचा सुगन्ध येथे वृक्षरुपानी दरवळेल.देवराई 2021 उपक्रमास आपल्या सलाईबन परिवार व तरुणाईकडून कायम मार्गदर्शन असेल

  • मंजितसिंग शिख
    मानद वन्यजीवरक्षक ,
DEVRAI

बुलडाणा जिल्हा

ह्यावेळी सौ स्मिता राजहंस – रेंज फॉरेस्ट ऑफीसर सामाजिक जळगाव जामोद,
श्री मंजितसिंग शिख -मानद वन्यजीव रक्षक बुलडाणा जिल्हा,श्री उमाकांत कांडेकर-तरुणाई फाउंडेशन,सौ रुपालिताई काळपांडे-जि प सदस्या,श्री महादेवराव धुर्डे -उपसभापती पंचायत समितीश्री रामेश्वर अंबडकर- सरपंच सूनगाव श्री चौधरी साहेब ग्रामसेवक,सुनील भगत-इंजिनियर,श्री संतोष कतोरे-ग्रँथपाल एस के के कॉलेजआश्विन राजपूत -छायाचित्रकार व पत्रकार,शालिग्राम भगत,अनिल हिसल,वनविभागाचे कर्मचारी वृंद,सामाजिक वनीकरण चे कर्मचारी , ग्रामपंचायत सूनगाव चे कर्मचारी ,स्थानिक आदिवासी नागरिक,महिलाव तालुक्यातील बहुसंख्य नागरिक कोविड नियमांचे पालन करून श्रमदानास उपस्थित होते.यावेळी 51 रोपे मान्यवरांनी व 150 रोपे श्रमदात्यांनी एकाच दिवशी लावली, आजपर्यंत 1001 पैकी 450 रोपे लागली आहेत ,15 ऑगस्टपुर्वी सर्व रोपे लावायची वनसैनिकांची योजना आहे.0 ₹ बजेट ठेऊन श्रमदानातून व लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या या पर्यावरणपूरक कामाची सर्वस्तरातून कौतुक होत आहे.यावेळी सोशल दिस्टन्स ने झालेल्या छोट्या सभेत प्रास्ताविक आश्विन राजपूत यांनी,सनचं निवृत्ती वंडाळे यांनी तर आभारप्रदर्शन संतोष कतोरे यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विन राजपूत,महादेव धुर्डे, सरपंच रामेश्वर अंबडकर,ग्रामसेवक चौधरी,अभिषेक राजपूत,वैभव गव्हाळे,सुरेश मिरटकार,लखन ,अभिषेक राजपूत,करणं राजपूत,प्रवीण भगत,व सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.